• Download App
    जगातील सर्वात शुभ्र पांढरा रंग बनवण्यात शास्त्रज्ञांना यश, एसी पेक्षाही पॉवरफुल | The most white color has been created by american scientists

    जगातील सर्वात शुभ्र पांढरा रंग बनवण्यात शास्त्रज्ञांना यश, एसी पेक्षाही पॉवरफुल

    विशेष प्रतिनिधी 

    इंडियाना  : गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये आता एका नव्या आणि आगळ्यावेगळ्या गोष्टींची नोंद झाली आहे. आजवरचा सर्वात जास्त शुभ्र पांढरा रंग बनवण्यात अमेरिकेतील इंडियाना येथील पुरझु विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी यश मिळवले आहे. जगातील आजवरचा सर्वात शुभ्र पांढरा रंग तयार करण्यात मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे प्राध्यापक शूलिन रुआन यशस्वी झाले आहेत.

    The most white color has been created by american scientists

    सात वर्षांपूर्वी त्यांनी हा प्रकल्प सुरू केला होता. विजेची बचत आणि ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी प्रोजेक्ट्स करण्याचे ध्येय त्यांचे होते. पण सूर्याचा प्रकाश परावर्तित करणारा पांढरा रंग तयार करण्याचा विचार आल्याने त्यांनी हा प्रोजेक्ट आधी हाती घेतला. आणि त्या प्रोजेक्टमध्ये त्यांना यश देखील मिळाले.


    विज्ञानाची डेस्टिनेशन्स : शास्त्रज्ञांच्या मते डुक्करच देणार साथींची पूर्वसूचना


    हा पांढरा रंग सूर्याच्या अतिनील किरणांचा वेगाने परावर्तित करतो. हा रंग ९८.१  टक्के सोलर रेडिएशन थांबवतो आणि इन्फ्रारेड हिट उत्सर्जित करतो. सूर्याची गरम किरणे परावर्तित करत असल्यामुळे घरातील तापमान कमी होण्यास आणि गर्मीपासून रक्षण करण्यासाठी हा रंग अतिशय उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे लोकांचा एसीचा खर्चदेखील वाचण्याची शक्यता आहे.

    एक हजार चौरस फूट घराला हा कलर दिल्यास दहा किलोवॅट कूलिंग पॉवर तयार होते. हा कलर घरात बसवलेल्या एसीपेक्षा अधिक शक्तिशाली आहे. असा रुहानी यांचा दावा आहे. हे अल्ट्रा व्हाईट पेंट बाजारात आणण्यासाठी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी एका कंपनीशी चर्चा देखील केली आहे. त्यामुळे लवकरच हा पांढरा रंग सामान्य नागरिकांना उपलब्ध होऊ शकतो.

    The most white color has been created by american scientists

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या