• Download App
    ‘’भारतात माध्यम स्वतंत्र आहेत आणि ते खरोखर कार्य करताय’’ अमेरिकेच्या सहाय्यक परराष्ट्र मंत्र्यांनी केलं कौतुक!The media in India is independent and it really works praised the US Assistant Secretary of State

    ‘’भारतात माध्यम स्वतंत्र आहेत आणि ते खरोखर कार्य करताय’’ अमेरिकेच्या सहाय्यक परराष्ट्र मंत्र्यांनी केलं कौतुक!

    भारतातील माध्यम स्वातंत्र्याबाबत माझ्या मनात खूप आदर आहे.

    विशेष प्रतिनिधी

    वॉशिंग्टन : अमेरिकेचे सहाय्यक परराष्ट्र मंत्री डोनाल्ड लू यांनी भारतातील माध्यम स्वातंत्र्य आणि जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशातील लोकशाहीला पाठिंबा देण्यासाठी पत्रकारांच्या भूमिकेचे कौतुक केले आहे. The media in India is independent and it really works praised the US Assistant Secretary of State

    दक्षिण आणि मध्य आशियासाठी अमेरिकेचे सहाय्यक परराष्ट्र मंत्री असणाऱ्या लू यांनी सांगितले की, “तिथे काहीही गुप्त ठेवले जात नाही. भारतात लोकशाही आहे कारण त्यांच्याकडे स्वतंत्र माध्यमं आहेत, जी प्रत्यक्षात काम करतात.” तसेच, लू यांनी सांगितले की, ‘’मला माहीत आहे की मीडिया मार्केट बदलत आहे, परंतु भारतातील माध्यम स्वातंत्र्याबाबत माझ्या मनात खूप आदर आहे.’’

    याशिवाय लू यांनी म्हटले की, “मला आठवतं की मी एकदा परराष्ट्र मंत्रालयाला भेट दिली होती. जिथे मी एका वरिष्ठ अधिकाऱ्याला आरटीआय अर्जांना प्रतिसाद देण्यासाठी असलेल्या फाइल्सच्या ढिगाऱ्यासमोर काम करताना पाहिले होते. ते अधिकारी काम करताना तक्रार करत होते आणि मी केवळ हसू शकत होतो, कारण आम्हालाही आपल्या नोकरीत तेच काम करावे लागते, जिथे जर कोणी कागदपत्रं मागितली तर मला ते कागदपत्रं शोधण्यासाठी अनेक दिवस घालवावे लागतात, लोकशाहीत हेच होते. याचबरोबर लू यांनी पत्रकारांची भूमिका आणि त्यांच्याद्वारे भारतीय लोकशाहीचे समर्थन करण्यासाठी होणाऱ्या कामाची प्रशंसा केली आहे.

    The media in India is independent and it really works praised the US Assistant Secretary of State

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Canada : कॅनडात मंदिराच्या भिंतीवर लिहिल्या खलिस्तानी घोषणा; नगर कीर्तनापूर्वी कारवाई

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार