• Download App
    अमेरिकेने पाठवली शस्त्रास्त्रांची पहिली खेप, आता इस्रायलच्या प्रत्युत्तर कारवाईने हमास हादरणार! The first shipment of weapons sent by the United States now Hamas will be shaken by Israels countermeasures

    अमेरिकेने पाठवली शस्त्रास्त्रांची पहिली खेप, आता इस्रायलच्या प्रत्युत्तरातील कारवाईने हमास हादरणार!

    जाणून घ्या काय म्हणाले, जो बायडेन

    विशेष प्रतिनिधी

    हमासच्या दहशतवादाला इस्रायल असे प्रत्युत्तर देत आहे की, दहशतवाद्यांचा माज लवकरच संपणार आहे. हमासचे अर्थमंत्रीही इस्रायली लष्कराने मारले आहेत. दरम्यान, अमेरिकन शस्त्रास्त्रांची पहिली खेप इस्रायलला पाठवण्यात आली आहे. त्याच वेळी, जो बायडेन यांनी ट्विट केले आहे की हे युद्ध अनेक अमेरिकन कुटुंबांसाठी वैयक्तिक आहे. The first shipment of weapons sent by the United States now Hamas will be shaken by Israels countermeasures

    सीएनएनशी बोलताना राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन्स कोऑर्डिनेटर जॉन किर्बी म्हणाले, ‘तुम्ही हमासची धमकी हलक्यात घेऊ शकत नाही. तुम्हाला हे गांभीर्याने घ्यावे लागेल, कारण हमासने आधीच दाखवून दिले आहे की ते यासाठी सक्षम आहेत. त्यामुळे साहजिकच, आम्ही याकडे खूप बारकाईने पाहत आहोत. आम्ही इस्रायलींशी बोललो आहोत आणि त्यांना अतिरिक्त गुप्त माहिती देऊ केली.

    ते पुढे म्हणाले,  ‘ओलिसांमध्ये अमेरिकन आहेत की नाही हे आम्हाला माहीत नाही. ते कुठे आहेत हे आम्हाला माहीत नाही. त्यांना कसे ठेवले जातात हेही आम्हाला माहित नाही. हे एक सक्रिय वॉरझोन आहे, ज्यामुळे पर्याय कठीण  होतात, परंतु स्पष्पणे आम्ही या संकटाचा सामना करण्यासाठी शक्य ते सर्व काही करणार आहोत, मग ओलिसांमध्ये अमेरिकन असतील किंवा नसतील.

    The first shipment of weapons sent by the United States now Hamas will be shaken by Israels countermeasures

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Jagannath Rath Yatra : कॅनडात जगन्नाथ रथयात्रेवर अंडी फेकली; भाविकांनी म्हटले- द्वेष श्रद्धेला हरवू शकत नाही; भारत सरकारला कारवाईचे आवाहन

    Trump : ट्रम्प यांची युक्रेनला पॅट्रियट क्षेपणास्त्रे पाठवण्याची घोषणा; म्हणाले- पुतिन दिवसा गोड बोलतात, रात्री बॉम्बस्फोट करतात

    Jaishankar : चीनच्या उपराष्ट्रपतींना भेटले परराष्ट्र मंत्री जयशंकर; म्हणाले- दोन्ही देशांमधील संबंध सुधारत आहेत