प्रतिनिधी
बीजिंग : बर्ड फ्लूच्या रुग्णांची नोंद अजूनही फक्त पक्षी, कोंबड्या आणि प्राण्यांमध्येच होत होती, मात्र चीनमध्ये मानवांमध्ये त्याच्या संसर्गाची पहिली घटना समोर आली आहे. चीनच्या आरोग्य विभागाने मंगळवारी याला दुजोरा दिला. मात्र हा संसर्ग इतर लोकांमध्ये पसरण्याचा धोका कमी असल्याचे सांगण्यात आले आहे. The first human patient infected with bird flu in China Infection of a four year old child
मिळालेल्या माहितीनुसार, हेनान प्रांतातील एका चार वर्षांच्या मुलाला ५ एप्रिल रोजी ताप आणि इतर लक्षणांची पुष्टी झाली होती. त्यानंतरच्या तपासणीत बर्ड फ्लूच्या H3N8 स्ट्रेनची पुष्टी करण्यात आली आहे. राष्ट्रीय आरोग्य आयोगाने मुलाच्या संपर्कात असलेल्या लोकांमध्ये संसर्ग आढळलेला नाही, असा अहवाल दिला आहे. चार वर्षांचा हा मुलगा आपल्या घरातील कोंबड्या आणि पक्ष्यांच्या संपर्कात असल्याचे तपासात आढळून आले.
साथीचे रोग होण्याचा धोका कमी
चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने म्हटले आहे की, प्राथमिक तपासणीत असे आढळले आहे की बर्ड फ्लूच्या एच 3 एन 8 स्ट्रेनमध्ये मानवाला प्रभावीपणे संक्रमित करण्याची क्षमता नाही. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर साथीचे रोग पसरण्याचा धोका कमी असतो. तज्ज्ञांच्या मते, एच 3 एन 8 स्ट्रेन आतापर्यंत घोडे, कुत्रे, पक्ष्यांमध्ये आढळला होता. पण आतापर्यंत मानवांमध्ये हा प्रकार आढळल्याची बातमी आली नव्हती.
The first human patient infected with bird flu in China Infection of a four year old child
महत्त्वाच्या बातम्या
- Petrol – diesel hike : मुख्यमंत्र्यांचा पंतप्रधानांवर पलटवार; पण उद्या डिझेलवरील कर घटविण्याचा कॅबिनेटमध्ये प्रस्ताव!!
- ओडिशातील उष्णतेच्या लाटेमुळे आजपासून पाच दिवस शिक्षण संस्था बंद ठेवण्याचे सरकारचे आदेश
- Nashik : ब्राह्मण समाजाच्या बदनामीच्या निषेधार्थ ब्राह्मण महासंघाचा भव्य मोर्चा; मनसे, भाजप नेते सहभागी;
- भारतात २४ तासात २,७२९ नवे रुग्ण ३२ जणांचा मृत्यू