विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : चीन मधल्या शेवटच्या भारतीय पत्रकाराला तिथल्या माओवादी सरकारने जून अखेरीस चीन सोडायला सांगितला आहे. 2023 च्या सुरुवातीला चीनमध्ये 4 भारतीय पत्रकार होते. त्यातल्या 3 पत्रकारांना चीनने आधीच व्हिसा रिन्यूअल नाकारले. त्यामुळे त्यांना भारतात परत यावे लागले आणि आता जून अखेरीस तिथला शेवटचा भारतीय पत्रकार भारतात परत येणार आहे. The Chinese Maoist government expelled Indian journalists from China
पण हे सगळे घडताना भारतात लोकशाही नसल्याचा, दडपशाही असल्याचा, स्वातंत्र्य धोक्यात आल्याचा डांगोरा पिटणाऱ्या लिबरल गॅंगने मात्र हु की चू केलेले नाही. सगळीच्या सगळी लिबरल गॅंग गप्प आहे!!
वास्तविक गेल्या 4 महिन्यांमध्ये चीनने व्हिसा रिन्यूअल नाकारलेल्या पत्रकारांमध्ये प्रसार भारती, द हिंदू आणि हिंदुस्थान टाइम्स या माध्यमांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. या पत्रकारांना भारतात परत यावे लागले आहे आणि पीटीआयच्या वृत्तसंस्थेच्या पत्रकाराला चिनी माओवादी सरकारने जून अखेरीस भारतात चीन सोडायचे आदेश दिले आहेत. याचा अर्थ चीनमध्ये आता एकही भारतीय पत्रकार उरणार नाही.
गलवान व्हॅलीत चीनने घुसखोरी केल्यानंतर भारताने प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून कठोरपणे चिनी ॲप्स वर बंदी घातली होती. त्यानंतर भारत आणि चीन यांच्यातला राजनैतिक पातळीवरचा संघर्ष वाढलाही होता. पण भारताने चीन अथवा कुठल्याही परदेशी पत्रकाराला भारतातून रिपोर्टिंग करायचे नाकारले नाही. किंवा कोणत्याही पत्रकारावर रिपोर्टिंग संदर्भात बंधने आणली नाहीत.
चिनी सरकार मात्र परदेशी पत्रकारांवर सरकारी नियंत्रण लादते. भारतात परदेशी पत्रकारांना कोणी सहाय्यक नेमायचा असेल तर त्यावर बंधन नाही. पण चीनमध्ये मात्र सहाय्यक नेमताना चिनी माओवादी सरकारने परदेशी पत्रकारांवर बंधन घातले. या सहाय्यकांना चिनी माओवादी सरकारच्या स्क्रुटीनीतून जावे लागते.
अर्थातच या मुद्द्यावर मतभेद झाले. चिनी माओवादी सरकारने भारतीय पत्रकारांवर चिनी पत्रकारांची अयोग्य वर्तणूक दिल्याचा ठपका ठेवला आणि एकेक करून भारतीय पत्रकारांना व्हिसा रिन्यूअल नाकारले. त्यामुळे आता भारतीय पत्रकारांना चीन सोडावा लागला आहे.
पण हा सर्व प्रकार भारतातले लिबरल्स मात्र मूग गिळून गप्प राहून पाहत आहेत. वास्तविक द हिंदू माध्यम समूह लिबरल्सचा पुरोधा मानला जातो. पण द हिंदूही गप्प आहे. हिंदुस्तान टाइम्सही गप्प आहे. पीटीआय, प्रसार भारती या सरकारी माध्यम संस्था आहेत. पण त्यांच्या माध्यम स्वातंत्र्याच्या स्वायत्तता भारतात अबाधित आहेत.
असे असतानाही देशातली लिबरल गॅंग मोदी सरकार विरुद्ध नॅरेटिव्ह तयार करताना देशात लोकशाही नाही, हुकूमशाही आहे, माध्यमांची गळचेपी होते आहे, असे वारंवार आरोप करत राहते. पण चिनी माओवादी सरकारने भारतीय पत्रकारांना हाकल्ल्यानंतरही या लिबरल गॅंगने हू की चूक केले नाही.
The Chinese Maoist government expelled Indian journalists from China
महत्वाच्या बातम्या
- मध्यप्रदेश : सातपुडा भवन इमारतीला भीषण आग, मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी हवाई दलाची मागितली मदत
- प्रियांकांना राष्ट्रीय मैदानात उतरवण्याची तयारी याचा अर्थ काँग्रेसचा “राहुल प्रयोग” फसल्याची कबुली!!
- कायदा सुव्यवस्थेबाबत विरोधकांचा “नॅरेटिव्ह गदारोळ”, पण महाराष्ट्राच्या सर्वेक्षणात मात्र शिंदे – फडणवीसांनाच पूर्ण बहुमत!!
- अभिनेत्री राधिका देशपांडेची “द फोकस इंडियाच्या गप्पाष्टक” या कार्यक्रमात हजेरी अनेक प्रश्नांना दिली