विशेष प्रतिनिधी
लंडन : ब्रिटनच्या आरोग्य मंत्र्यांना आपल्या सहकारी मैत्रीणीसोबत लिपलॉक अवस्थेत टिपणारा सीसीटीव्ही कॅमेरा लावलाच कसा गेला याची चौकशी सुरू असल्याचे ब्रिटनच्या प्रशासनामार्फत सांगण्यात आले आहे. ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक यांनी सहकाऱ्याचे चुंबन घेतानाचे फोटो समोर आले होते. यावर कोविड मार्गदर्शक नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला होता. The CCTV camera that captured the health minister’s liplock is now under investigation
हॅनकॉक यांनीही नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. त्यांच्या राजीनाम्यानंतर ब्रिटनचे माजी अर्थमंत्री साजिद जाविद यांची आरोग्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली आहे. हॅनकॉक यांनी जॉन्सन यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की,या महामारीत लोकांनी दिलेल्या बलिदानाचे आम्ही ऋणी आहोत. अशा परिस्थितीत त्यांच्याशी प्रामाणिक राहण्याची आपली जबाबदारी आहे. मी नियमांचे उल्लंघन करून त्यांना निराश केले आहे
सन वृत्तपत्राने आरोग्य विभागाच्या कार्यालयात हॅनकॉक आणि वरिष्ठ सहकाऱ्याला मिठी मारल्याचे चित्र प्रकाशित केले होते. ते म्हणाले की लॉकडाउन नियम शिथिल करण्यापूर्वी 11 दिवस आधी 6 मे रोजी सीसीटीव्ही चित्रे घेण्यात आली होती. यानंतर हॅनकॉक यांनी नियमांचे उल्लंघन स्वीकारले.
हॅनकॉक यांच्या कार्यालयातील स्मोक अलार्म मशीनच्या आतमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लपविण्यात आला होता. त्याचबरोबर या कॅमेऱ्याचे फुटेज कसे लिक झाले याचीही चौकशी करण्यात येत आहे. येथील कॅमेरा हा मंत्रालयाच्या वतीनेच काढून टाकण्यात आला आहे, असे जावेद यांनी सांगितले.
जावेद म्हणाले, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आरोग्य मंत्र्यांया कार्यालयात कॅमेरा असणे योग्य नाही. आपण आजपर्यंंत पाच मंत्रालयांमध्ये काम केले. त्याठिकाणी असे कॅमेरे नव्हते. मग आरोग्य मंत्रालयातच कॅमेरा का लावण्यात आला याची चौकशी करण्यात येत आहे.
ब्रिटनचे कायदा मंत्री रॉबर्ट बुकलॅँड यांनी सांगितले की मंत्र्यांना सुरक्षितपणे काम करणाऱ्यांसाठी त्यांच्या कार्यालयातून कॅमेरे हलविले गेले पाहिजे. मंत्रालयाच्या इमारतीत सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सीसीटीव्ही कॅमेरा असणे गरजेचे आहे. मात्र, मंत्र्यांच्या दालनामध्ये अशा प्रकारची उपकरणे असणे योग्य नाही. यामुळे राष्ट्रीय सुरक्षेलाही धोका पोहोचू शकतो.
The CCTV camera that captured the health minister’s liplock is now under investigation
महत्त्वाच्या बातम्या.
- कसाबला पकडणाऱ्या तुकाराम ओंबळे यांना अनोखी श्रध्दांजली, महाराष्ट्रात सापडलेल्या नव्या उडणाऱ्या कोळ्यास दिले आयसीयस तुकाराम नाव
- जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील पराभवाने अखिलेश यादव यांना धक्का, म्हणाले आगामी विधानसभा निवडणुकीत साडेतीनशे जागा मिळविणार
- दक्षिण कोरियाही उभारणार आयर्न डोम यंत्रणा, उत्तर कोरियाच्या युध्दपिपासू धोरणामुळे निर्णय