रावळपिंडीहून जाणाऱ्या हजारा एक्स्प्रेसच्या दहा बोगी रुळावरून घसरल्या आणि उलटल्या
विशेष प्रतिनिधी
लाहोर : पाकिस्तानमध्ये आज एक भीषण रेल्वे दुर्घटना घडली आहे. रावळपिंडीहून जाणाऱ्या हजारा एक्स्प्रेसच्या दहा बोगी रुळावरून घसरल्या आणि उलटल्या, किमान २२ जणांचा मृत्यू झाला आणि ८० जण जखमी झाले. जिओ टीव्हीच्या वृत्तानुसार, शहजादपूर आणि नवाबशहा दरम्यान असलेल्या सहारा रेल्वे स्थानकाजवळ ही दुर्घटना घडली. Terrible train accident in Pakistan Hazara Express derailed 22 killed 80 injured
ज्यावेळी हा अपघात झाला, त्यावेळी ट्रेन कराचीहून पाकिस्तानातील पंजाबला जात होती. मिळालेल्या माहितीनुसार, जखमींना नवाबशाह येथील पीपल्स मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ट्रेन रुळावरून घसरण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. अपघातानंतर जवळच्या रुग्णालयांमध्ये आपत्कालीन प्रोटोकॉल लागू करण्यात आला आहे.
वृत्तसंस्थेनुसार, पाकिस्तान रेल्वेचे उपअधीक्षक महमूद रहमान यांनी पुष्टी केली की दुर्घटना झालेल्या बोगीतून किमान 22 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर सुमारे 80 जखमींना रुग्णालयात नेले जात आहे. सध्या बचाव कार्य आणि रुळावरून घसरलेल्या डब्यांमधून लोकांना बाहेर काढण्यावर भर आहे.
Terrible train accident in Pakistan Hazara Express derailed 22 killed 80 injured
महत्वाच्या बातम्या
- ‘चांद्रयान-3’ बद्दल GOOD NEWS! चंद्राच्या कक्षेत पोहोचले, ‘इस्रो’ने दिली माहिती
- नेमाडेंची मुक्ताफळे; औरंगजेबाच्या दोन राण्या काशीच्या पंड्यांनी केल्या भ्रष्ट; शिवाजी महाराजांचा मुख्य सरदार मुसलमान, तर औरंगजेबाचा हिंदू!!
- Earthquake: दिल्ली-एनसीआर मध्ये ५.८ रिश्टर स्केलचा भूकंप, लोक घाबरून पळाले घराबाहेर
- तामिळनाडू : मंत्री व्ही.सेंथील बालाजी यांच्या निकटवर्तीयाच्या घरावर ‘ED’चा छापा!