• Download App
    Tarek Fatah Profile : इस्लामिक विद्वान तारीक फतेह यांचे निधन, पाकमध्ये जन्म, कॅनडात घेतला अखेरचा श्वास; स्वतःला म्हणवायचे हिंदुस्थानी|Tarek Fatah Profile Death of Islamic scholar Tarek Fateh, born in Pakistan, breathed his last in Canada

    Tarek Fatah Profile : इस्लामिक विद्वान तारीक फतेह यांचे निधन, पाकमध्ये जन्म, कॅनडात घेतला अखेरचा श्वास; स्वतःला म्हणवायचे हिंदुस्थानी

    प्रतिनिधी

    टोरंटो : पाकिस्तानी वंशाचे इस्लामिक विद्वान तारेक फतेह यांचे सोमवारी दीर्घ आजाराने निधन झाले. 73 वर्षीय फतेह सोशल मीडियावर खूप लोकप्रिय होते. ते अनेकदा टीव्ही डिबेटमध्येही झळकायचे.Tarek Fatah Profile Death of Islamic scholar Tarek Fateh, born in Pakistan, breathed his last in Canada

    तारेक फतेह जिहादचे कट्टर विरोधक होते. इतरांचा जीव घेणे म्हणजे जिहाद नाही, असे ते नेहमी म्हणत. फतेह हे नेहमीच पाकिस्तान सरकार आणि लष्कराचे प्रखर विरोधक राहिले आहेत. ते स्वतःला हिंदुस्थानी म्हणवत असत.

    फतेह यांचा जन्म 20 नोव्हेंबर 1949 रोजी पाकिस्तानातील कराची शहरात झाला. 1960 आणि 70 च्या दशकात ते डाव्या विचारसरणीने प्रेरित होते. त्या काळात पाकिस्तानात लष्करी राजवट होती. फतेह यांना दोनदा तुरुंगातही जावे लागले. 1977 मध्ये जनरल झिया-उल-हक यांनी त्यांच्यावर देशाचा विश्वासघात केल्याचा आरोप केला आणि वृत्तपत्रांमध्ये स्तंभ लिहिण्यासही बंदी घातली. यानंतर 1987 मध्ये त्यांनी कॅनडाला जाण्याचा निर्णय घेतला.



    आपल्या देशाचा केला त्याग

    राजकीय कार्यकर्ते असण्यासोबतच ते टीव्ही होस्ट आणि लेखकही होते. त्यांचे ‘चेझिंग अ मिराज: द ट्रॅजिक इल्युजन ऑफ अॅन इस्लामिक स्टेट’ हे पुस्तक बेस्ट सेलर ठरले. याशिवाय ‘द ज्यू इज नॉट माय एनिमी’ ही खूप गाजले होते.

    फतेह म्हणायचे – मी पंजाबचा सिंह, भारताचा सुपुत्र, कॅनडाचा प्रेमी, सत्याचा पुरस्कर्ता आणि अन्यायाविरुद्ध लढणारा माणूस आहे. फतेह यांची कन्या नताशाने सोशल मीडियावर वडिलांच्या मृत्यूची माहिती दिली. नताशानेही तिच्या वडिलांच्याच शब्दांत सोशल मीडियावर पुनरावृत्ती केली.

    तारेक म्हणाले होते- मोदींनी पाकला उपासमारीच्या उंबरठ्यावर आणले

    तारेक फतेह यांनी अनेक प्रसंगी भाजप आणि पंतप्रधान मोदींना उघडपणे पाठिंबा दिला. 2021 मध्ये एका पाकिस्तानी टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत तारेक म्हणाले होते – मोदींनी एकही गोळी न चालवता पाकिस्तानला उपासमारीच्या उंबरठ्यावर आणले. पाकिस्तानच्या राजकारण्यांनी मोदींकडून शिकण्याची वेळ आली आहे.

    रविवारीही नताशाने सोशल मीडियावर एक मेसेज पोस्ट केला होता. त्यात म्हटले होते – रविवार सुस्त होता. पप्पांनी जुनी बॉलीवूड गाणी ऐकली आणि सांगितले की, ते भारतमातेवर किती प्रेम करतात.

    मी तर होतो राजपूत..

    एका मुलाखतीत तारेक म्हणाले होते – मी एका राजपूत कुटुंबातून आलो आहे, ज्यांना 1840 मध्ये इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले गेले. मी पाकिस्तानात जन्मलेला भारतीय मुलगा आहे. सलमान रश्दींच्या पुस्तकातील मिडनाइट्स चिल्ड्रनच्या अनेक मुलांपैकी मी एक आहे.एक गौरवशाली सभ्यता सोडून आम्हाला आयुष्यभर निर्वासित बनवण्यात आले.

    Tarek Fatah Profile Death of Islamic scholar Tarek Fateh, born in Pakistan, breathed his last in Canada

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या