Taliban Take The Southern City Of Kandahar : तालिबानने अफगाणिस्तानचे दुसरे मोठे शहर कंधार ताब्यात घेतले आहे. वृत्तसंस्था असोसिएटेड प्रेस (एपी) च्या मते, तालिबानने आतापर्यंत 34 पैकी 12 प्रांतांवर आपले राज्य प्रस्थापित केले आहे. कंधारला गुरुवारी रात्री उशिरा तालिबान्यांनी ताब्यात घेतले. तालिबान काबूलपासून अवघ्या काही किमी अंतरापर्यंत आले आहे. Taliban Take The Southern City Of Kandahar 12th Provincial Capital Out Of 34 To Fall To Insurgents
वृत्तसंस्था
काबूल : तालिबानने अफगाणिस्तानचे दुसरे मोठे शहर कंधार ताब्यात घेतले आहे. वृत्तसंस्था असोसिएटेड प्रेस (एपी) च्या मते, तालिबानने आतापर्यंत 34 पैकी 12 प्रांतांवर आपले राज्य प्रस्थापित केले आहे. कंधारला गुरुवारी रात्री उशिरा तालिबान्यांनी ताब्यात घेतले. तालिबान काबूलपासून अवघ्या काही किमी अंतरापर्यंत आले आहे.
तालिबानने एक व्हिडीओही जारी केला आहे, ज्यामध्ये कंधारमधील शहीद चौकात पोहोचल्याचा दावा केला आहे. तालिबानने अनेक प्रमुख राजधान्यांवर ताबा मिळवल्याचा दावा केला आहे. तथापि, तालिबान लढाऊंनी गुरुवारी खूप वेगाने चाल केली आहे.
तालिबानने आतापर्यंत कंधार, हेरात, गझनी, कुंदुज, तखर, बदाखशान, सामंगान, निमरुझ, फराह, जब्बाजान, बागलाण आणि सार-ए-पुल प्रांत ताब्यात घेतले आहेत. प्रमुख शहरांपैकी फक्त मजार-ए-शरीफ आणि काबूल हेच आता तालिबानच्या नियंत्रणाबाहेर आहेत.
येथे भारताने गुरुवारी पुन्हा एकदा अफगाणिस्तानमध्ये राहणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षेबाबत सल्ला जारी केला आहे. यामध्ये असे म्हटले गेले आहे की, फ्लाइट बंद होण्याआधी ताबडतोब भारतीयांनी देशात परतण्याची तयारी करावी. भारतीय कंपन्यांनीही आपल्या कर्मचाऱ्यांना परत पाठवावे. कव्हरेजसाठी आलेल्या भारतीय पत्रकारांनीही अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था करावी, असेही म्हटले आहे. यापूर्वी भारतीय दूतावासाने 29 जून, 24 जुलै आणि 10 ऑगस्ट रोजी सल्ला जारी केला होता.
तालिबानला सत्तेची ऑफर
तालिबानच्या मजबूत होत चाललेल्या वर्चस्वादरम्यान अफगाणिस्तान सरकारने हिंसा थांबवण्यासाठी तालिबानला सत्तेचा वाटा देऊ केला आहे. तालिबानने मात्र अध्यक्ष अशरफ घनी यांच्या सरकारशी बोलणी करण्यास नकार दिला. त्याचवेळी अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलांनी गझनीचे राज्यपाल दाऊद लघमणी, नायब राज्यपाल आणि कार्यालय संचालकांसह काही अधिकाऱ्यांना अटक केली आहे. त्याला वरदक प्रांतातून अटक करण्यात आली आहे.
Taliban Take The Southern City Of Kandahar 12th Provincial Capital Out Of 34 To Fall To Insurgents
महत्त्वाच्या बातम्या
- ट्विटर इंडियाकडून MD मनीष माहेश्वरींची उचलबांगडी, केंद्राशी ओढवून घेतला होता वाद, नव्या जबाबदारीसह अमेरिकेत बदली
- Adi Godrej Resigns : गोदरेज इंडस्ट्रीजच्या चेअरमनपदाचा आदि गोदरेज यांचा राजीनामा, नादिर गोदरेज घेणार त्यांची जागा
- अर्थव्यवस्थेत सुधारणांचे संकेTaliban Take The Southern City Of Kandaharत : किरकोळ महागाई जुलैमध्ये ५.५९%, तीन महिन्यांतील सर्वात कमी; औद्योगिक उत्पादनही वाढले
- Share Market : 55 हजारी झाले सेन्सेक्स, अर्थव्यवस्था मजबुतीच्या संकेतांमुळे गुंतवणूकदारांत उत्साह
- मुंबईत डेल्टा प्लस प्रकारामुळे पहिला मृत्यू, संपर्कात आलेले इतर दोन जणही पॉझिटिव्ह, आतापर्यंत 7 रुग्णांची नोंद