• Download App
    तालिबानचे मजुरांसाठी ‘फूड फॉर वर्क’, पैशाच्या बदल्यात धान्य मिळणार|Taliban started food for work schme

    तालिबानचे मजुरांसाठी ‘फूड फॉर वर्क’, पैशाच्या बदल्यात धान्य मिळणार

    विशेष प्रतिनिधी

    काबूल – अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने देशातील भूकबळींची स्थितीत सुधारणा घडवून आणण्यासाठी फूड फॉर वर्क योजना सुरू केली आहे. यानुसार मजुरांना कामाच्या बदल्यात धान्य देण्यात येणार आहे.Taliban started food for work schme

    त्यामुळे काबूल शहरातील ४० हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. मुजाहिदने म्हटले की, देशातील बेरोजगारी संपवण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरेल. परंतु त्याचा लाभ घेण्यासाठी मजुरांना बरेच काम करावे लागेल. अफगाणिस्तानात गेल्या एक दीड महिन्यांपासून अन्नधान्याची मोठी टंचाई जाणवत आहे.



    आर्थिक स्थिती देखील ढासळली आहे. या योजनेचा फायदा पूर्वीपासूनच कामावर असलेल्या मजुरांना मिळणार नाही. मात्र हिवाळ्यातील संभाव्य बेरोजगारीमुळे एखाद्या मजुराची उपासमार होणार असेल तर त्याला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

    या योजनेनुसार काबूल शहरात ११,६०० टन तर हेरत, जलालाबाद, कंदाहार, मजार ए शरीफ, पूल एक खुमरी येथे ५५ हजार टन गहू दिला जाणार आहे. हे मजुर काबूल शहरात उन्हाळ्याच्या सामना करण्यासाठी तलाव तयार करणार आहेत.

    Taliban started food for work schme

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या