विशेष प्रतिनिधी
दोहा – काश्मीरसह जगाच्या पाठीवर कोणत्याही भागात रहात असलेल्या मुस्लिमांच्या बाजूने आवाज उठविण्याचा आपल्याला हक्क आहे, असा दावा तालिबानने केला आहे. Taliban spokeperson backs kashmiri
अफगाणिस्तानच्या ‘स्वातंत्र्या’नंतर आता मुस्लिमांनी सर्व मुस्लिम प्रदेश मुक्त करावेत, अशी चिथावणी अल कायदा या दहशतवादी संघटनेने दिली आहे. जिहादसाठी त्यांनी काही प्रदेशांची नावेही दिली आहेत. या यादीत इराक, सीरिया, जॉर्डन, लेबनॉन, लीबिया, मोरोक्को, अल्जेरिया, ट्युनिशिया, सोमालिया, येमेन या देशांसह काश्मीनरचाही समावेश आहे.
तालिबानचा प्रवक्ता सुहेल शाहीन याने आज ‘बीबीसी’ला मुलाखत दिली. तो म्हणाला, एक मुस्लिम गट म्हणून काश्मीेर आणि इतर कोणत्याही देशात राहणाऱ्या मुस्लिमांच्या हक्काबाबत बोलणे हा आमचा अधिकारच आहे. हक्कानी नेटवर्कवर होणारे आरोपही सुहेल शाहीन याने फेटाळले.
हक्कानी विरोधातील सर्व प्रचार हा केवळ आरोपांवर आधारित आहे. हक्कानी नेटवर्क ही संघटना नसून इस्लामिक अफगाणिस्तान अमिरातीचाच एक भाग आहे, असेही शाहीन याने स्पष्ट केले.
Taliban spokeperson backs kashmiri
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनामुळे मृत्यूवर भरपाईचे धोरण नसल्याने केंद्राला फटकारले, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले- ‘तुम्ही काही करेपर्यंत तिसरी लाटही निघून जाईल’
- न्यूझीलंडमध्ये दहशतवादी हल्ला : इसिसच्या जिहादीने 6 जणांना चाकूने भोसकले, 3 जण गंभीर; पोलिसांच्या गोळीबारात हल्लेखोर ठार
- काबूलमध्ये ‘तालिबान सरकार’ स्थापनेचे होर्डिंग्ज, हक्कानी नेटवर्कलाही सत्तेत स्थान, मुल्ला बरादर करणार नेतृत्व