• Download App
    तालिबानी कारभार : सत्तेत येताच दाखवले खरे रंग, महिलांच्या मंत्रालयात महिलांनाच बंदी |Taliban replaces women's ministry with ministry of virtue and vice.

    तालिबानी कारभार ; सत्तेत येताच दाखवले खरे रंग, महिलांच्या मंत्रालयात महिलांनाच बंदी

    विशेष प्रतिनिधी

    काबूल : अफगाणिस्तानमध्ये तालिबानी महिला मंत्रालय बंद केले आहे. यामुळे महिलांच्या हक्कावर गदा आली आहे. तालिबानचे पुढचे पाऊल म्हणून महिला मंत्रालय बंद करण्यात आले आहे. या मंत्रालयाच्या जागी मिनिस्ट्री ऑफ प्रमोशन व्हर्च्यु अँड प्रिवेंशन ऑफ वाईस असे मंत्रालय स्थापन केले आहे.Taliban replaces women’s ministry with ministry of virtue and vice.

    तालिबानी सरकार आता या मंत्रालयाद्वारे ‘मॉरल पोलिसिंग’ चे काम करणार आहे. अफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापन झाल्यापासून महिलांच्या बाबतीत जे काही निर्णय घेण्यात आले आहेत त्यामुळे समाजामध्ये एक दहशत आहे.



    सध्या अफगाणिस्तानातील महिलांना कामावर जाणे अवघड होत आहे. तसेच शाळेमध्ये शिक्षण घेणे हे पण अवघड होत चालले आहे आणि महिलांना सरकारमध्ये सामील करण्यास तालिबानने आधीच नकार दिला आहे.

    १९९६ मध्ये जेव्हा सरकार आले होते तेव्हाही या मंत्रालयाचा उपयोग महिलांच्यावर बंधने करण्यासाठीच केला जात होता. आणि शरिया कानूनची अंमलबजावणी केली जात होती. आता (तालिबान) मंत्रालयाची स्थापना झाली आहे. या मंत्रालयात काम करणाऱ्या महिला असे सांगत आहेत की, त्यांची नोकरी गेली आहे.

    आधी त्यांना मंत्रालयात प्रवेश दिला जात नव्हता परंतु आता तेथे कुलुप लावले गेले आहे. आणि त्यामुळे ते खाते बंद झाले आहे. यामुळे महिला नाराज झाल्या आहेत. काही महिला तर घरातील एकमेव कमावणाऱ्या आहेत आणि हे मंत्रालय बंद झाल्यामुळे त्यांच्या नोकरीवर गदा आली आहे.

    या जागी जे मंत्रालय काम करेल ते लोकांना शिस्त शिकवणार आहे आणि या मंत्रालयाद्वारे तालिबान आपले हुकूम देणार आहे. शरिया कायदा लागू करण्याच्या नावाखाली कट्टरपंथी तालिबानचा अजेंडा राबवला जाणार आहे.

    याआधी तालिबाननी सहावी ते बारावीचे शाळा सुरू करण्याबाबत आदेश दिले होते. पण त्यातही तालिबानी विचारांची दिशा दाखवून फक्त मुलांसाठी शाळा सुरू कराव्यात असे सांगितले आहे. आणि आजही मुलींच्या शिक्षणाबाबत कोणताही आदेश दिला गेला नाहीये.

    Taliban replaces women’s ministry with ministry of virtue and vice.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Jagannath Rath Yatra : कॅनडात जगन्नाथ रथयात्रेवर अंडी फेकली; भाविकांनी म्हटले- द्वेष श्रद्धेला हरवू शकत नाही; भारत सरकारला कारवाईचे आवाहन

    Trump : ट्रम्प यांची युक्रेनला पॅट्रियट क्षेपणास्त्रे पाठवण्याची घोषणा; म्हणाले- पुतिन दिवसा गोड बोलतात, रात्री बॉम्बस्फोट करतात

    Jaishankar : चीनच्या उपराष्ट्रपतींना भेटले परराष्ट्र मंत्री जयशंकर; म्हणाले- दोन्ही देशांमधील संबंध सुधारत आहेत