• Download App
    दानिश सिद्दिकीच्या मृत्यूत हात नसल्यचा तालिबानचा दावा, खेद व्यक्त करीत उपरती|Taliban regrets for death of danish

    दानिश सिद्दिकीच्या मृत्यूत हात नसल्यचा तालिबानचा दावा, खेद व्यक्त करीत उपरती

    विशेष प्रतिनिधी

    कंदहार : भारतीय वृत्तछायाचित्रकार दानिश सिद्दिकी यांच्या मृत्यूमागे तालिबानचा हात नसल्याचा खुलासा तालिबान या दहशतवादी संघटनेचा प्रवक्ता जबिउल्ला मुजाहिद याने एका वृत्तवाहिनाशी बोलताना शनिवारी केला. त्यांच्या मृत्यूवर त्याने खेद व्यक्त केला आहे.Taliban regrets for death of danish

    ‘‘सिद्दिकी याच्या मृत्यूचा खेद आहे. कोणतीही माहिती न देता पत्रकार युद्धक्षेत्रात प्रवेश करत आहेत, या गोष्टीचे आम्हाला दु:ख होत आहे. युद्धक्षेत्रात प्रवेश करणाऱ्या कोणत्याही पत्रकाराने आम्हाला सूचना दिली तर आम्ही त्या व्यक्तीची खास काळजी घेऊ,’’ असेही मुजाहिदने सांगितले.



    गोळीबारात एखाद्या भारतीय पत्रकाराचा मृत्यू झाल्याची माहिती आमच्याकडे नाही. त्याचा मृत्यू कसा झाला हेही आम्हाला माहीत नाही,’ असे तो म्हणाला. दानिश सिद्दिकी यांचे पार्थिव ‘इंटरनॅशनल कमिटी ऑफ द रेड क्रॉस’ (आयसीआरसी) या संस्थेकडे सोपविले आहे.

    भारतीय अधिकारी मृतदेह भारतात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. कंदहारमधील स्पीन बोल्डक जिल्ह्यात अफगाण सैन्य – तालिबानमध्ये झालेल्या चकमकीदरम्यान दानिश यांचा मृत्यू झाला होता.

    Taliban regrets for death of danish

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या