• Download App
    अफगाणिस्तानात तालिबानच्या नव्या राजवटीतून महिला मंत्रालय गायब |Taliban regim opposing women rights

    अफगाणिस्तानात तालिबानच्या नव्या राजवटीतून महिला मंत्रालय गायब

    विशेष प्रतिनिधी

    काबूल – अफगाणिस्तानमध्ये आता तालिबानी राजवट सुरू झाली असून त्यांच्या कट्टरतेचे अनुभव येण्यास सुरुवात झाली आहे. देशाच्या प्रगतीसाठी आवश्येक असलेले महिला विकास मंत्रालय बरखास्त करून तालिबानी नेत्यांनी ‘नैतिकता आणि गैरवर्तन प्रतिबंध मंत्रालया’ची निर्मिती शनिवारी केली.Taliban regim opposing women rights

    तालिबानच्या इस्लाम धर्माचे पालन करण्यावर या मंत्रालयाकडून जागृती करण्यात येणार आहे. यात महिलांना पुरुषांबरोबर काम करण्यास बंदी घातली आहे. याद्वारे तालिबानच्या १९९०च्या मधील सत्ताकाळातील महिलांवरील कठोर निर्बंध पुन्हा लादले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.



    ‘नैतिकता आणि गैरवर्तन प्रतिबंध मंत्रालय या नव्या मंत्रालयाअंतर्गत महिला मंत्रालयाची समावेश असल्याविषयी तालिबानने काहीही माहिती दिली नाही.

    Taliban regim opposing women rights

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Jagannath Rath Yatra : कॅनडात जगन्नाथ रथयात्रेवर अंडी फेकली; भाविकांनी म्हटले- द्वेष श्रद्धेला हरवू शकत नाही; भारत सरकारला कारवाईचे आवाहन

    Trump : ट्रम्प यांची युक्रेनला पॅट्रियट क्षेपणास्त्रे पाठवण्याची घोषणा; म्हणाले- पुतिन दिवसा गोड बोलतात, रात्री बॉम्बस्फोट करतात

    Jaishankar : चीनच्या उपराष्ट्रपतींना भेटले परराष्ट्र मंत्री जयशंकर; म्हणाले- दोन्ही देशांमधील संबंध सुधारत आहेत