UN General Assembly : अफगाणिस्तानचे नवे सत्ताधारी तालिबानने न्यूयॉर्कमध्ये सुरू असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेच्या दरम्यान संयुक्त राष्ट्रात आपला एक राजदूत नियुक्त केला आहे. यासह तालिबानने UNGA ला न्यूयॉर्कमधील त्यांच्या प्रतिनिधीला मेळाव्यास संबोधित करण्याची संधी देण्यास सांगितले आहे. Taliban now want to address UN General Assembly, appoint Sohail Shaheen as UN envoy
वृत्तसंस्था
काबूल : अफगाणिस्तानचे नवे सत्ताधारी तालिबानने न्यूयॉर्कमध्ये सुरू असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेच्या दरम्यान संयुक्त राष्ट्रात आपला एक राजदूत नियुक्त केला आहे. यासह तालिबानने UNGA ला न्यूयॉर्कमधील त्यांच्या प्रतिनिधीला मेळाव्यास संबोधित करण्याची संधी देण्यास सांगितले आहे.
तालिबानच्या वतीने संयुक्त राष्ट्र संघाचे प्रतिनिधी म्हणून मोहम्मद सोहेल शाहीन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कतारमध्ये सुरू असलेल्या शांतता चर्चेदरम्यान शाहीन संघटनेचे प्रवक्ते होते. असे मानले जाते की, तालिबानचे हे पाऊल अफगाणिस्तानचे माजी राजदूत आणि तालिबान यांच्यात एक नवीन राजनैतिक तणाव सुरू करू शकते. संयुक्त राष्ट्र ही सर्वोच्च संस्था आहे आणि अशा परिस्थितीत तालिबानने घेतलेला निर्णय हे एक मोठे आव्हान मानले जात आहे.
तालिबानचा संवेदनशील निर्णय
संपूर्ण जगाच्या नजरा यावेळी अफगाणिस्तानातील तालिबानच्या प्रत्येक पायरीवर आहेत. जागतिक समुदाय अद्याप या संघटनेला मान्यता देण्याच्या मन:स्थितीत नसताना आता संयुक्त राष्ट्रसंघाला घेऊन आलेल्या तालिबानच्या या घोषणेला संवेदनशील निर्णय म्हणून संबोधले जात आहे. प्रश्न उपस्थित केले जात आहेत की, तालिबानला खरोखरच इतक्या मोठ्या व्यासपीठावर विचार मांडण्याची संधी दिली पाहिजे का? तसे असल्यास, दहशतवादी संघटनेला आपले विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य किती प्रमाणात दिले पाहिजे?
Taliban now want to address UN General Assembly, appoint Sohail Shaheen as UN envoy
महत्त्वाच्या बातम्या
- आसाम सरकार आणि ULFA मध्ये चर्चा सुरू, केंद्रही शांतता चर्चेचा होणार सहभागी, मुख्यमंत्री सरमा यांचे प्रतिपादन
- Evergrande crisis : एका चिनी कंपनीमुळे जगभरातील 500 गर्भश्रीमंतांचे 135 बिलियन डॉलर्सचे नुकसान, भारताला का होणार फायदा?, वाचा सविस्तर…
- बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये फक्त 107 दिवसांत 1 कोटी गुंतवणूकदारांची भर, 8 कोटींचा टप्पा पार, कोरोना काळात शेअर बाजाराला पसंती
- ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये शक्तिशाली भूकंप, रिश्टर स्केलवर 5.9 तीव्रता, अनेक इमारतींचे नुकसान, पाहा व्हिडिओ
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेच्या दौऱ्यात विविध विषयांवर चर्चा; कोरोना वैश्विक शिखर संमेलनातही भाग घेणार