• Download App
    तालिबानी नेता अनस हक्कानीची महमूद गझनवीच्या कबरीला भेट, सोमनाथ मंदिर विध्वंसाचा केला उल्लेख । taliban leader anas haqqani visited mahmud ghaznavi shrine says he smashed somnath temple

    तालिबानी नेता अनस हक्कानीची महमूद गझनवीच्या कबरीला भेट, सोमनाथ मंदिर विध्वंसाचा केला उल्लेख

    taliban leader anas haqqani : अफगाणिस्तानात तालिबान सत्तेवर येऊन दीड महिन्याहून अधिक काळ झाला आहे आणि आता त्यांनी आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे. तालिबानचा नेता अनस हक्कानी मंगळवारी क्रूरकर्मा महमूद गझनवीच्या थडग्यावर पोहोचला. येथे पोहोचल्यावर त्याने गझनवीचे कौतुक केले आणि सोमनाथ मंदिर पाडल्याचाही उल्लेख केला. taliban leader anas haqqani visited mahmud ghaznavi shrine says he smashed somnath temple


    वृत्तसंस्था

    काबूल : अफगाणिस्तानात तालिबान सत्तेवर येऊन दीड महिन्याहून अधिक काळ झाला आहे आणि आता त्यांनी आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे. तालिबानचा नेता अनस हक्कानी मंगळवारी क्रूरकर्मा महमूद गझनवीच्या थडग्यावर पोहोचला. येथे पोहोचल्यावर त्याने गझनवीचे कौतुक केले आणि सोमनाथ मंदिर पाडल्याचाही उल्लेख केला.

    महमूद गझनवीने गुजरातमधील सोमनाथ मंदिराचा विध्वंस केला होता. त्याने भारतावर 17 वेळा हल्ला केला होता. अनस हक्कानी त्याच्या दर्ग्यात पोहोचला होता. येथे पोहोचल्यावर हक्कानीने अभिमानाने सोमनाथ मंदिराच्या विध्वंसाचा उल्लेख केला.

    हक्कानीने ट्विट केले की, “आज आम्ही 10व्या शतकातील मुस्लिम योद्धा आणि मुजाहिद महमूद गझनवी यांच्या स्मृतिस्थळाला भेट दिली. गझनवीने मजबूत मुस्लिम राजवट स्थापन केली होती आणि सोमनाथ मंदिर नष्ट केले होते.”

    1026 मध्ये मंदिरावर हल्ला

    भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक सोमनाथ मंदिरावर 1026 मध्ये महमूद गझनवीने हल्ला केला होता. असे म्हटले जाते की, अरब प्रवासी अल-बिरुनी यांच्या प्रवासवर्णनात मंदिराचा उल्लेख पाहिल्यानंतर गझनवीने सुमारे 5 हजार साथीदारांसह या मंदिरावर हल्ला केला. त्याने मंदिराची मालमत्ताही लुटली. सोमनाथ मंदिरावर आधी आणि नंतर अनेक वेळा हल्ले झाले आणि मंदिर पाडण्यात आले, पण प्रत्येक वेळी ते पुन्हा बांधण्यात आले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आदेशानुसार हे मंदिर पुन्हा बांधण्यात आले. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे श्री सोमनाथ मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आहेत.

    taliban leader anas haqqani visited mahmud ghaznavi shrine says he smashed somnath temple

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले