• Download App
    लग्नात गाणे वाजवले म्हणून तालीबान्यांनी १३ जणांना ठार केले|Taliban kill 13 at wedding party because they listen music

    लग्नात गाणे वाजवले म्हणून तालीबान्यांनी १३ जणांना ठार केले

    विशेष प्रतिनिधी

    काबूल : तालिबानने टीव्हीवर संगीत आणि महिलांचे आवाज ऐकण्यावरही बंदी घातली आहे. लोकांनी याचे पालन करावे यासाठी तालीबानने प्रचंड क्रुर कृत्ये सुरू केली आहेत. लग्नाच्या कार्यक्रमात गाणे वाजविल्याने तालीबान्यांनी तेरा जणांना ठार केले.Taliban kill 13 at wedding party because they listen music

    नांगरहार प्रांतात तालिबानने 13 जणांची निर्घृण हत्या केली असे माजी उपाध्यक्ष अमरुल्ला सालेह यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. माजी उपराष्ट्रपतींनी एका ट्विटमध्ये म्हटलं आहे की, तालिबानने या 13 निरपराध लोकांना केवळ लग्नाच्या कार्यक्रमात गाणी वाजवल्यामुळे मारले.



    ना ही गाणी बंद करायची होती. सालेह यांनी आपल्या ट्विटमध्ये पुढे लिहिले की, प्रतिकार ही राष्ट्रीय गरज आहे आणि आपण फक्त निषेध करून आपला राग व्यक्त करू शकत नाही.
    तालिबानच्या या क्रूरतेसाठी पाकिस्तान जबाबदार असल्याचा आरोप करून सालेह यांनी म्हटले आहे की,

    अफगाण संस्कृतीला मारण्यासाठी आणि आमच्या देशावर नियंत्रण ठेवण्यासाठी पाकिस्तानने त्यांना 25 वर्षे इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस-अनुपालन धर्मांधतेचे प्रशिक्षण दिले आणि आता त्यांचे काम सुरू झाले आहे.

    तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर ताबा मिळवला आणि संपूर्ण देशाचा ताबा आपल्याकडे घेतला. तालिबानने ताबा मिळवल्यानंतर अनेक आश्वासने दिली, मात्र अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा नागरिकांच्या हत्यांचे पर्व सुरू झाले आहे. अफगाणिस्तानातील लोक तालिबानच्या नियमांना घाबरत आहेत.

    Taliban kill 13 at wedding party because they listen music

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या