विशेष प्रतिनिधी
काबूल – अफगाणिस्तानात सत्तेवर आलेल्या तालिबान शासकांनी आत्मघाती हल्लेखोरांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. आत्मघाती पथके हे देशाचे नायक असल्याचे तालिबानने म्हटले आहे.Taliban gives certificate to Talibani terrorists
गेल्या दोन दशकांत अमेरिकी आणि अफगाणिस्तान सैनिकांवर हल्ले करणाऱ्या आत्मघाती पथकातील हल्लेखोराच्या कुटुंबीयांना जमीन देण्याची घोषणा या वेळी तालिबानकडून करण्यात आली आहे.
तालिबानचा अंतर्गत व्यवहार मंत्री सिराजुद्दीन हक्कानी याने काबूल हॉटेल येथे जमलेल्या दहशतवाद्याच्या नातेवाइकांची भेट घेऊन चर्चा केली. या ठिकाणी शंभराहून अधिक नातेवाईकांनी हजेरी लावली.
प्रत्येक कुटुंबाची गळाभेट घेतल्यानंतर हक्कानी याने प्रत्येक कुटुंबाला दहा हजार अफगाणी (११२ डॉलर) दिले आणि लवकरच भूखंड देण्याचे आश्वा सन दिले. खोस्ती याने हक्कानीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला असून तो या फोटोत हक्कानी हा नातेवाइकांसमवेत दिसतो.
Taliban gives certificate to Talibani terrorists
महत्त्वाच्या बातम्या
- विज्ञानाची गुपिते : कोलेस्टेरॉलचे असेही मोलाचे महत्व
- विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : चांदीचे असेही व्यापक परिणाम
- मेंदूचा शोध व बोध : मानसिक आजाराकडे दुर्लक्ष नको
- मनी मॅटर्स : तात्काळ खरेदी करु नका.
- लाईफ स्किल्स : इतरांपेक्षा वेगळे काहीतरी करा
- आर्यन खानची बेल नाकारण्यात आल्यानंतर शाहरुख खान, सलमान खान, अक्षय कुमार, सैफ अली खान यांचा ‘हा’ फोटो होतोय व्हायरल