• Download App
    अफगाणिस्तानात उच्चशिक्षणाचे दरवाजे महिलांसाठी खुलेच, तालिबान सरकारकडून स्पष्ट |Taliban gave permission for girls education

    अफगाणिस्तानात उच्चशिक्षणाचे दरवाजे महिलांसाठी खुलेच, तालिबान सरकारकडून स्पष्ट

    विशेष प्रतिनिधी

    काबूल – ‘आम्हाला पुन्हा आमचे घड्याळ वीस वर्षे मागे न्यायचे नाही. सध्या जे आहे, त्याचाच आधार घेऊन तालिबानला पुढे जायचे आहे,’ असे सांगत तालिबान सरकारमधील उच्च शिक्षण मंत्री अब्दुल बाकी हक्कानी याने महिलांना शिक्षणाची परवानगी असल्याचे जाहीर केले.Taliban gave permission for girls education

    अफगाणिस्तानात विद्यापीठांमध्ये विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या महिलांना त्यांचे शिक्षण पुढे सुरु ठेवता येईल, पदव्युत्तर शिक्षणही घेता येईल, असे स्पष्टीकरण तालिबान सरकारने दिले आहे. हक्कानी याने शिक्षणाबाबत नवीन धोरणे जाहीर केली.



    तो म्हणाला तालिबानच्या आधीच्या सत्ताकाळात मुलींना आणि महिलांना शिक्षण घेण्यास बंदी होती. ‘विद्यापीठात महिलांना उच्च शिक्षणही घेता येईल. मात्र, त्यांना हिजाब घालणे सक्तीचे असेल. विद्यापीठांमध्ये शिकविल्या जाणाऱ्या विषयांचाही आढावा घेतला जाईल,’ असे त्याने स्पष्ट केले. तालिबानच्या आधीच्या सत्तेवेळी त्यांनी संगीत आणि कला शिक्षणावर बंदी घातली होती.

    Taliban gave permission for girls education

    महत्त्वाच्या बातम्या.

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या