• Download App
    महिला, मुलींना नेलपॉलिश लावल्यास बोटे छाटणार, तालिबानकडून जुलमी फतवे जारी|Taliban gave nansty fatwas for womens

    महिला, मुलींना नेलपॉलिश लावल्यास बोटे छाटणार, तालिबानकडून जुलमी फतवे जारी

    विशेष प्रतिनिधी

    काबूल – अफगाणिस्तानमधील महिलांना मंत्रिमंडळात स्थान देणार, त्यांनी शिक्षण घेता येईल व नोकरीही करता येईल. नागरिकांना त्रास देणार नाही, असे सकारात्मक चित्र तालिबानने गेल्या आठवड्यात रंगवले होते.Taliban gave nansty fatwas for womens

    पण येथील माध्यतमांच्या दाव्यानुसार तालिबानच्या क्रूरतेचे दर्शन नुकतेच झाले. एक मुलगा आणि त्या‍च्या मित्रांनी जीन्स घातल्याने तालिबान्यांनी त्यांना मारहाण करीत अशी चूक पुन्हा न करण्याची धमकीही बंदुकीच्या धाकाने दिली.



    एका अफगाणी वृत्तपत्राने तालिबानी संघटनेची क्रूरतेची उदाहरणे दिली आहे. पारंपरिक वेश परिधान न केल्याने एका पत्रकाराला या दहशतवाद्यांनी बेदम मारले. कंदहारमध्ये तालिबानने अफगाणी महिलांसाठी फतवा काढला आहे. त्यानुसार महिलांनी नेलपॉलिश लावण्यानस बंदी केली आहे. जर कोणी नेलपॉलिश लावले तर शिक्षा म्हणून त्यांची बोटे कापली जातील, अशी धमकी दिली आहे.

    तसेच उंच टाचेच्या सँडलवरही प्रतिबंध घातले आहेत. याचे कारण म्हणजे चालताना अशा सँडलचा आवाज होतो आणि त्यामुळे पुरुषांचे लक्ष विचलीत होते. महिलांच्या पायांचा आवाज इतर कोणाला ऐकू जाऊ नये म्हणून त्यावर बंदी आणली आहे.

    Taliban gave nansty fatwas for womens

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या