वृत्तसंस्था
काबूल : अफगाणिस्तानात तालिबानने तबला आणि हार्मोनियम जाळले; म्हणाले- संगीतामुळे नैतिक भ्रष्टाचार, तरुणाई भरकटते तालिबान सत्तेवर आल्यानंतर अफगाणिस्तानात अनेक बदल झाले आहेत. तिथे महिलांच्या नोकऱ्या आणि शिक्षणावर बंदी घालण्यापासून ते ब्यूटी पार्लर बंद करण्यापर्यंत. त्याचबरोबर अफगाणिस्तानमध्ये संगीताला अनैतिक घोषित करण्याची तयारी सुरू आहे.Taliban burn musical instruments, ban on music in Afghanistan, claim youth are misguided
एएफपी या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार तालिबानने अफगाणिस्तानात संगीत वाद्ये जाळली आहेत. अफगाणिस्तानच्या हेरात प्रांतात तालिबान्यांनी तबला, हार्मोनियम आणि गिटारसारखी वाद्ये गोळा केली आणि त्यांना आग लावली, ही घटना गत आठवड्याच्या अखेरची आहे.
हेरात प्रांतातील सदाचाराला चालना देणाऱ्या मंत्रालयाचे प्रमुख अझीझ अल-रहमान अल-मुहाजिर म्हणाले की, संगीताचा प्रचार केल्याने नैतिक भ्रष्टाचार होतो आणि ते वाजवल्याने तरुणांची दिशाभूल होते.
तालिबानने पेटवलेल्या वाद्यांमध्ये तबला, हार्मोनियम आणि गिटार तसेच ड्रम, अॅम्प्लिफायर आणि स्पीकर यांचा समावेश आहे. यातील अनेक शंभर डॉलर्स किमतीचे असल्याचे सांगितले जाते आणि हेरातमधील लग्नाच्या हॉलमधून जप्त करण्यात आले होते.
ऑगस्ट 2021 मध्ये सत्तेत आल्यापासून तालिबान नैतिकतेचा हवाला देत महिलांचे हक्क हिरावून घेत आहेत. संयुक्त राष्ट्र संघानेही याबाबत चिंता व्यक्त केली आहे. महिन्याच्या सुरुवातीला तालिबानने सर्व ब्यूटी पार्लर बंद करण्याची घोषणा केली. अफगाणिस्तानात हजारो ब्युटी पार्लर आहेत. त्यांची मालकी फक्त महिलांकडे आहे.
अफगाणिस्तानला जागतिक मान्यतेची प्रतीक्षा
महिलांच्या अधिकारांवर निर्बंध असूनही अफगाणिस्तानने जगाने त्यांना मान्यता देण्याची मागणी केली आहे. गेल्या आठवड्यात तालिबानचे कार्यवाहक संरक्षण मंत्री मुल्ला मोहम्मद याकूब मुजाहिद यांनी अल-अरेबिया वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती.
यावेळी ते म्हणाले होते – सरकारने मान्यता मिळवण्यासाठी सर्व आवश्यकता पूर्ण केल्या आहेत. असे असूनही अमेरिकेच्या दबावाखाली इतर देश आम्हाला मान्यता देत नाहीत. आम्ही अमेरिकेच्या दबावाखाली नसलेल्या देशांना मान्यता देण्याचे आवाहन करतो. जगातील सर्वात शक्तिशाली इस्लामिक देशांनी आम्हाला सरकार म्हणून मान्यता द्यावी अशी आमची इच्छा आहे.
Taliban burn musical instruments, ban on music in Afghanistan, claim youth are misguided
महत्वाच्या बातम्या
- समृद्धी महामार्गावर भीषण दुर्घटना! शहापूर येथे गर्डरसह क्रेन कोसळल्याने १५ कामगारांचा मृत्यू
- Lok Sabha Elections 2024 : पंतप्रधान मोदींनी ‘NDA’ खासदारांना लोकसभा निवडणुकीसाठी दिला कानमंत्र!
- 2015 मधले भाकीत 2023 मध्ये ठरले खरे; देशातले सर्वांत मोठे राजकीय हवामान तज्ञ आज मोदींबरोबर व्यासपीठावर!!
- Land For Job Scam प्रकरणात ‘ED’चा लालूंना दणका, सहा कोटींची मालमत्ता जप्त!