Taliban bans covid 19 vaccine : तालिबानने अफगाणिस्तानच्या पूर्व भागातील पक्तिया प्रांतात कोरोना विषाणूच्या लसीवर बंदी घातली आहे. यासंदर्भात पक्तिया प्रादेशिक रुग्णालयाबाहेर नोटीस लावण्यात आली आहे. अफगाणिस्तानचे रेडिओ आणि दूरदर्शन प्लॅटफॉर्म शमशाद न्यूजने याबाबत माहिती दिली आहे. गेल्या आठवड्यात तालिबान्यांनी प्रांतातील एका गुरुद्वारामधून निशाण साहिब काढून टाकले होते. आता देशाचा संपूर्ण दक्षिण भाग त्यांच्या ताब्यात आला आहे. Taliban bans covid 19 vaccine in afghanistan partying video viral on social media
वृत्तसंस्था
काबूल : तालिबानने अफगाणिस्तानच्या पूर्व भागातील पक्तिया प्रांतात कोरोना विषाणूच्या लसीवर बंदी घातली आहे. यासंदर्भात पक्तिया प्रादेशिक रुग्णालयाबाहेर नोटीस लावण्यात आली आहे. अफगाणिस्तानचे रेडिओ आणि दूरदर्शन प्लॅटफॉर्म शमशाद न्यूजने याबाबत माहिती दिली आहे. गेल्या आठवड्यात तालिबान्यांनी प्रांतातील एका गुरुद्वारामधून निशाण साहिब काढून टाकले होते. आता देशाचा संपूर्ण दक्षिण भाग त्यांच्या ताब्यात आला आहे.
दरम्यान, फेसबुकवर एक व्हिडिओही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात तालिबानचे नेते जौजनच्या शेबरघन येथे मार्शल अब्दुल रशीद दोस्तम यांच्या घरी पार्टी करताना दिसत आहेत. 67 वर्षीय दोस्तम देशाचे माजी उपराष्ट्रपतीही राहिले आहेत. संघटनेने गेल्या आठवड्यात देशाच्या उत्तरेला असलेली ही प्रांतीय राजधानी काबीज केली. आम्ही अधिकृतपणे या व्हिडिओची पुष्टी करू शकत नाही. विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, व्हिडिओमध्ये तालिबानी नेते एका मोठ्या हॉलमध्ये बसल्याचे दिसत आहे.
तालिबानने देशाचा 65 टक्के भाग व्यापला
तालिबानने अफगाणिस्तानचा 65 टक्के भाग ताब्यात घेतल्याचा अंदाज आहे. आता ते राजधानी काबुलच्या दारात उभे आहेत. शुक्रवारी तालिबानने कंधार, लष्करगाह आणि हेरात काबीज केले. शनिवारी बातमी आली की, आता लोगार प्रांतही व्यापला गेला आहे. अमेरिकेच्या माघारीच्या निर्णयानंतर या देशातील परिस्थिती बिघडली आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी 14 एप्रिल रोजी अफगाणिस्तानातून सर्व अमेरिकन सैन्य मागे घेणार असल्याचे सांगितले होते. सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया 1 मेपासून सुरू झाली.
Taliban bans covid 19 vaccine in afghanistan partying video viral on social media
महत्त्वाच्या बातम्या
- बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांची ओळख उघड केल्याबद्दल राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल, पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी
- ‘मागण्या मान्य केल्या नाही तर ईडी, सीबीआय मागे लावू’, मुख्यमंत्री ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकरांना व्हॉट्सअॅपवर धमक्या
- “बी.कॉमचा निकाल जाहीर करा, नाहीतर उडवून टाकू!”, मुंबई विद्यापीठाला बॉम्बने उडवण्याची ईमेलद्वारे धमकी
- काबूलमधील 257 अफगाणी शीख आणि हिंदू कुटुंबांना वाचवा, वर्ल्ड पंजाबी ऑर्गनायझेशनचे गृहमंत्री अमित शहा यांना आवाहन
- पीएम मोदी सप्टेंबरमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित करण्याची शक्यता, 76व्या वार्षिक अधिवेशनाला 14 सप्टेंबरपासून सुरुवात