विशेष प्रतिनिधी
काबूल – अफगाणिस्तानात महिलांना काम करण्यासाठी तसेच शिकण्यासाठी पोषक वातावरण असेल असे आश्वासन तालिबानने दिले आहे. मात्र हे आश्वासन पाळण्याची कोणतीच शक्यता नसल्याचे सध्या तरी दिसत नाही. महिलांना काम करण्याच्या हक्कासाठी मोर्चा काढलेल्या महिलांना बळाचा वापर करून रोखण्यात आले.Taliban attacks on women protesters
महिलांना अध्यक्षीय प्रासादाच्या दिशेने मोर्चा नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अश्रुधूर आणि पेपर स्प्रेचा वापर करण्यात आला. मोर्चा नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे बळाचा वापर करणे भाग पडल्याचा दावा तालिबानने केल्याचे वृत्त टोलो न्यूजने दिले आहे.
राजधानी काबूल आणि हेरत येथे अनेक महिला वारंवार निदर्शने करीत आहेत. काम करू द्यावे याशिवाय सरकारमध्ये समावेश व्हावा अशीही त्यांची मागणी आहे. तालिबानने प्रशासनाचे स्वरूप येत्या काही दिवसांत जाहीर करू असे म्हटले आहे. महिला सरकारमध्ये असतील पण त्यांना मंत्रिपद दिले जाणार नाही हे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे.
Taliban attacks on women protesters
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना रुग्णाला व्हेंटिलेटरची खरोखरच गरज आहे का? भारतीय संशोधकाने केले एआय टूल विकसित
- कोरोना लसीकरणात भारत जगात अव्वल, विकसित राष्ट्रांच्या जी-७ देशांनी मिळून ऑगस्टमद्ये दिले १० कोटी डोस तर भारतामध्ये एकाच महिन्यात १८ कोटी
- पंजशीर खोऱ्यात नॉर्दन अलायन्सकडून तालीबानला जबरदस्त दणका, ६०० तालीबानी ठार
- गांधी परिवारात प्रशांत किशोर यांच्या कॉँग्रेस प्रवेशाची चर्चा पण विरोध करत वरिष्ठ नेते म्हणतात ते तर फुस्स बॉँब