विशेष प्रतिनिधी
काबूल – अफगाणिस्तानवर ताबा मिळविण्याच्या दिशेने तालिबानचे दहशतवादी वेगाने पुढे सरकत असून काबूलच्या दक्षिणेला असलेल्या लोगार प्रांत त्यांना ताब्यात घेतला आहे. तालिबानने देशातील ३४ पैकी २९ प्रांतावर ताबा मिळविला आहे. Taliban attacking fastly in Afghanistan
तालिबानने या प्रांताच्या राजधानीसह पूर्ण भागावर नियंत्रण मिळविले आहे. येथून अत्यंत जवळ असलेली राजधानी काबूल आता तालिबानच्या मार्गात आहे. याचबरोबर उत्तर अफगाणिस्तानमधील सर्वांत मोठे शहर असलेल्या मजार-ए-शरीफवर चोहोबाजूंनी हल्ले सुरू केले.
मजार-ए-शरीफचा बचाव करण्यासाठी अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी यांनी बुधवारी (ता.११) येथे भेट देऊन सरकारशी संबंधित अनेक दहशतवादी संघटनेच्या म्होरक्यांशी चर्चा केली होती. अमेरिकेचे सैन्य माघारी गेल्यानंतर तालिबान संघटना पुन्हा सक्रिय झाली असून अफगाणिस्तानच्या उत्तर, पश्चिनम आणि दक्षिणकडील प्रांत त्यांनी तीन आठवड्यात हस्तगत केले आहेत.
दरम्यान प्रादेशिक दहशतवादामुळे अफगाणिस्ताननंतर पाकिस्तानला सर्वांत जास्त नुकसान सोसावे लागले असल्याचा दावा पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जाहिद हफीज चौधरी यांनी पत्रकारांच्या साप्ताहिक संमेलनात केला. यात २००१नंतर ८० हजारपेक्षा लोकांना त्याचा फटका बसला तर १५० अब्ज डॉलरचे आर्थिक नुकसान झाले आहे.
Taliban attacking fastly in Afghanistan
महत्त्वाच्या बातम्या
- President Ram Nath Kovind Speech : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे देशवासीयांना संबोधन; कोरोना, कृषी, नवे संसद भवन, जम्मू-कश्मीरसह या मुद्द्यांचा उल्लेख
- World Youth Championships : पोलंडमध्ये भारतीय तिरंदाजांनी फडकावला तिरंगा, महिला संघापाठोपाठ पुरुष संघानेही जिंकले सुवर्ण
- सौर, पवन ऊर्जेच्या क्षमतेत भारत जगात चौथ्या क्रमांकावर, १ लाख मेगावॅटचा टप्पा ओलांडला
- सत्ता बदलताच नेपाळचा सूरही बदलला, नेपाळने म्हटले, चीन कधीही भारताची जागा घेऊ शकणार नाही