विशेष प्रतिनिधी
काबूल – तालिबानने अफगाणिस्तानमधील निम्म्याहून अधिक प्रदेश ताब्यात घेतला आहे. यामुळे अफगाणिस्तान सरकारचे धाबे दणाणले आहे. यावेळी झालेल्या हिंसाचारात एक हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात राजकीय स्थैर्य येण्यासाठी तालिबानचा सहभाग आवश्यृक असल्याचे मत व्यक्त होत आहे. हिंसाचार थांबविण्यासाठी तालिबानला सत्तेत वाटा देण्याची तयारी अफगाणिस्तान सरकारने दाखविली आहे. Taliban acting fast in Afghanistan
आता काबूल-कंदाहार महामार्गावर तालिबानने ताबा मिळविला आहे. देशाच्या संपूर्ण उत्तर आणि पश्चिाम भागावर सरकारचे कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही. अफगाण सैनिकांचे तळही तालिबानने नियंत्रण मिळविले असून अनेक शस्त्रे, वाहने आणि ड्रोनही दहशतवाद्यांच्या हातात पडले आहेत. एका आठवड्याच्या आत तालिबानने दहा प्रांतिक राजधान्यांवर पकड मिळविली आहे. त्यामुळे अफगाणिस्तानमधील सारी सत्तासमीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अमेरिकेकडून सैन्यमाघारी सुरु झाल्यामुळे तालिबानवर कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही. काबूल-कंदाहारही त्यांच्या ताब्यात जाण्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे, हिंसाचार थांबवून सत्तेत वाटा घ्या, असा प्रस्ताव अफगाणिस्तान सरकारने कतार सरकारमार्फत तालिबानसमोर ठेवला असल्याचे सूत्रांनी सांगितले. तालिबानने या प्रस्तावाबाबत त्यांची भूमिका जाहीर केलेली नाही.
Taliban acting fast in Afghanistan
महत्त्वाच्या बातम्या
- सेक्स गुलाम बनविण्यासाठी तालीबान अफगणिस्थानातील घराघरात मुली आणि विधवांचा घेतेय शोध
- अभिनेते प्रशांत दामले राज्य सरकारवर संतप्त, मोगॅँबो खुश हुआ म्हणत हॉटेल-मॉल्स मालकांचे अभिनंदन करत साधला निशाणा
- शिक्षणसम्राट मंत्र्यांना सामान्यांपेक्षा आपल्या संस्थांचीच काळजी, १५ टक्के फी कपातीवरून मंत्रीमंडळ बैठकीत खडाजंगी
- Maharashtra Unlock : 15 ऑगस्टपासून लॉकडाऊन मधून ‘स्वातंत्र्य’; टास्क फोर्सचा शाळा, महाविद्यालयं सुरू करण्यास विरोध