विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क – कोरोना विषाणूच्या संसर्गापासून संरक्षण मिळविण्यासाठी जगभरात लसीकरण मोहीम सुरु झाली आहे. या लशीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होत आहे. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनाही लस घेण्याचा सल्ला दिला जात आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना पुन्हा कोरोना होण्याची दुप्पट धोका आहे, असा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे.Take vaccine jab after corona
सीडीसी या संस्थेचा एक अभ्यास अहवाल जाहीर झाला आहे. जे रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत, अशांनाही लस घ्यावी, असा सल्लाही अहवालातून दिला आहे. लसीकरणामुळे शरीरातील नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्तीत वाढ होत असल्याचे पुरावे प्रयोगशाळेत मिळाले आहेत. विषाणूच्या नव्या प्रकारापासून लशीमुळे संरक्षण मिळत आहे, असेही त्यात म्हटले आहे.
- कोरोनाचे लसीकरण प्रमाणपत्र सेकंदात उपलब्ध, व्हॉट्सअॅपवर मिळेल ; फक्त मोबाईलवरुन पाठवावा लागेल संदेश
‘‘जर तुम्हाला आधी कोरोना झाला असला तरी लस घ्याह. विशेषतः विषाणूच्या डेल्टा हा अधिक धोकादायक प्रकार फैलावला असताना तुम्ही स्वतः आणि तुमच्या संपर्कातील लोक सुरक्षित राहण्यासाठी लसीकरण हा उत्तम उपाय आहे,’’ असे आवाहन ‘सीडीसी’ने केले आहे.
नव्या प्रकाराने पुन्हा संसर्ग होण्याबाबत माहिती फारशी नाही. पण अमेरिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी ब्रिटनमधील आकडेवारीचा आधार घेत ‘अल्फा’ प्रकारापेक्षा ‘डेल्टा’मुळे पुन्हा संसर्गाचा धोका उद्भीवू शकतो, असे निरीक्षण शास्त्रज्ञांनी नोंदविले आहे.
Take vaccine jab after corona
महत्त्वाच्या बातम्या
- सुमार कामगिरी असल्यास विधानसभेची उमेदवारी नाकारणार, जे. पी. नड्डा यांचा आमदारांना इशारा
- कोविन अॅप जबरदस्त, कॉँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी केले मोदी सरकारचे कौतुक
- महापुराच्या मदतीवर मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, लाँगटर्म योजना करत आहोत, काही वस्त्यांचं पुनर्वसन करावं लागेल !
- केंद्र सरकारने आरक्षणाची 50 टक्क्यांची अट शिथिल करावी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मागणी