विशेष प्रतिनिधी
लंडन – लसीकरणाला चालना मिळावी म्हणून जगातील अनेक देशांनी कंबर कसली आहे. नागरिकांनी लस घ्यावी म्हणून बक्षीसांची योजना जाहीर करण्यात आली आहे.
अमेरिकेत कॅलिफोर्नियात लस घेतलेल्या नागरिकांनी बक्षीसापोटी आतापर्यंत ५० हजार डॉलरची कमाई केली आहे, याशिवाय त्यांना १५ लाख डॉलरचे बक्षीस दिले जाणार आहे.Take vaccine and get prize
याच प्रांतात प्रत्येकी ५० डॉलर किमतीची २० लाख गिफ्ट कार्ड वाटणार, त्यासाठी ११६.५ दशलक्ष डॉलरची योजना आहे. न्यूयॉर्कमध्ये लस घेणाऱ्यांना शंभर डॉलर तसेच
पेस्ट्री, बीअरचेही बक्षीस दिले जात आहे.
थायलंडमध्ये लसीसाठी नोंदणी करणाऱ्यांमधील काही नागरिकांना बक्षीस म्हणून गाय देण्यात येणार आहे. चीनमध्ये काही ठिकाणी मोफत अंडी, काही शहरांत स्टोअरमधील खरेदीसाठी सवलतीची कुपन्स, काही गावांत रेशन दुकानातील वस्तूंवर सवलत दिली जाते.
सर्बियामध्ये लसीकरण करून घेतलेल्या नागरिकांना प्रत्येकी सुमारे ३० डॉलर इतक्या रकमेचे रोख बक्षीस देण्याची तरतूद करण्यात आली आहे.रशियातही लोकांना लसीकरणासाठी विविध प्रकारे लालुच दाखविली जात आहे. मॉस्कोमध्ये पहिला डोस घेतल्यानंतर लकी ड्रॉमध्ये नावनोंदणी केली जाते. त्यात दर आठवड्याला पाच जणांना मोटारी दिल्या जातात.
यातील एका मोटारीची किंमत दहा लाख रुबल्स इतकी भरभक्कम आहे.फिलीपीन्समध्ये लस घेणाऱ्यांना सोडत काढून चक्क गाय देण्याची घोषणा करण्यात आली असून याच पद्धतीने तांदळाच्या पोत्यांचेही बक्षीस दिले जाते.
Take vaccine and get prize
महत्त्वाच्या बातम्या
- जबरदस्त : जम्मू -काश्मिरात देशद्रोह आणि दगडफेक करणाऱ्यांना ना पासपोर्ट मिळणार, ना सरकारी नोकरी; आदेश जारी
- Inspiring : शेतमजुराची मुलगी बनली सीबीएसई 12 वीची टॉपर, अडचणींवर मात करत मिळवले 100 % गुण
- चर्चेची 12वी फेरी सकारात्मक : लडाखमधील 2 वादग्रस्त स्थळांवरून माघार घेण्यास चीन तयार, पीएलए हॉट स्प्रिंग आणि गोगरा पॉइंटमधून माघार घेणार
- आता तुम्ही तुमचे वय फेसबुकपासून लपवू शकणार नाही, १३ वर्षांपेक्षा कमी वयाचे युजर्स ओळखसाठी हे खास तंत्रज्ञान वापरणार