• Download App
    तैवानमध्ये 13 मजली इमारतीला भीषण आग, 46 जणांचा मृत्यू, 79 जण गंभीर भाजले; 14 जणांची प्रकृती चिंताजनक । Taiwan Overnight Fire Building Southern City Kaohsiung Many Killing Injuring Dozens

    तैवानमध्ये 13 मजली इमारतीला भीषण आग, 46 जणांचा मृत्यू, 79 जण गंभीर भाजले; 14 जणांची प्रकृती चिंताजनक

    तैवानच्या काऊशुंग शहरातील 13 मजली इमारतीत गुरुवारी भीषण आग लागली. यामुळे 46 जणांचा मृत्यू झाला आणि 79 जण होरपळले. अग्निशमन विभागाने सांगितले की, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्यापैकी 14 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. Taiwan Overnight Fire Building Southern City Kaohsiung Many Killing Injuring Dozens


    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : तैवानच्या काऊशुंग शहरातील 13 मजली इमारतीत गुरुवारी भीषण आग लागली. यामुळे 46 जणांचा मृत्यू झाला आणि 79 जण होरपळले. अग्निशमन विभागाने सांगितले की, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्यापैकी 14 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

    अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आग खूप भीषण होती आणि आगीत इमारतीचे अनेक मजले जळून खाक झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आग पहाटे 3च्या सुमारास लागली. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटनास्थळी उपस्थित लोकांनी सांगितले की, त्यांनी पहाटे 3 वाजता स्फोटाचा आवाज ऐकला होता.

    इमारत पूर्णपणे रिकामी करण्याचे आदेश

    अधिकाऱ्यांनी यापूर्वी इशारा दिला होता की, लोक इमारतीच्या निवासी भागात सातव्या ते अकराव्या मजल्यांमध्ये अडकलेले असू शकतात. मात्र, आता इमारत पूर्णपणे रिकामी करण्यात आली आहे. या अग्निकांडाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. व्हिडिओमध्ये, इमारतीच्या खालच्या मजल्यावरून ज्वाला आणि धूर निघताना दिसतो. त्याचवेळी अग्निशमन दलाचे जवानही रस्त्यावरून इमारतीवर पाणी शिंपडताना दिसत आहेत.

    Taiwan Overnight Fire Building Southern City Kaohsiung Many Killing Injuring Dozens

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    आम आदमी पार्टीच्या सोशल मीडिया हँडलरच्या डोक्यातून आली कॉकरोच जनता पार्टी; पण भ्रम आणि वास्तव!!

    PM Giorgia : मेलोनी हिंदीत म्हणाल्या- परिश्रम हीच यशाची गुरूकिल्ली; मोदी रोम व काशीला इटर्नल सिटी म्हणाले, इटलीच्या पंतप्रधानांना भारतभेटीचे निमंत्रण

    Taiwan : तैवानच्या रस्त्यांवर भारतविरोधी पोस्टर्स लागली; निवडणूक लढवणारा उमेदवार म्हणाला- भारतीय मजुरांना हाकलून द्या