• Download App
    स्विस बँकेतील भारतीय खातेदारांची तिसरी यादी जाहीर , ९६ देशांना माहिती पुरवलीswiss govt. handover bank accounts list

    स्विस बँकेतील भारतीय खातेदारांची तिसरी यादी जाहीर , ९६ देशांना माहिती पुरवली

    swiss govt. handover bank accounts list

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – देशातील काळ्या पैशासंबंधी स्विस बँकांमधील भारतीयांच्या खात्यांची तिसरी यादी स्वित्झर्लंड सरकारने केंद्र सरकारकडे सोपविली आहे. सुमारे ९६ देशांना ३३ लाख आर्थिक खात्यांची माहिती पुरविली असल्याचा दावा स्वित्झर्लंडने केला आहे.swiss govt. handover bank accounts list



    स्वित्झर्लंडच्या सांघिक कर प्रशासनाने (एफटीए) माहितीच्या आदान-प्रदानाच्या जागतिक मानकांवर आधारित तेथील बँकेतील खात्यांची माहिती या वर्षी भारताला दिली आहे.

    याआधी ऑक्टोबर २०२० मध्ये ‘एफटीए’ने ८६ देशांबरोबर ३१ लाख खात्यांची माहिती दिली होती. तर सप्टेंबर २०१९ मध्ये स्वित्झर्लंडने भारतासह ७५ देशांना माहिती पुरविली होती. ‘एफटीए’ने याबाबत सोमवारी सांगितले की, यंदा आणखी दहा देशांना माहितीचे देवाण-घेवाण केले आहे. यात अँटिग्वा आणि बर्ब्युडा, अझरबैझान, डॉमनिका, घाना, लेबनॉन, मकाऊ, पाकिस्तान, कतार, समोआ आणि वानुआतू या देशांचा समावेश आहे.

    स्वित्झर्लंडमधील ‘एफटीए’ने ज्याे देशांना आर्थिक माहिती दिली आहे, त्या सर्व ९६ देशांची नावे व अन्य तपशील उघड केलेले नाहीत.

    swiss govt. handover bank accounts list

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या