• Download App
    ब्रिटनमध्ये मध्यावधीपूर्वी सुनक यांच्या पक्षाची पीछेहाट; सर्व्हेत सुनक यांच्या पक्षास 117, तर विरोधकांना 425 वर जागा|Sunak's party retreats ahead of midterms in Britain; In the survey, Sunak's party got 117 seats, while the opposition got 425 seats

    ब्रिटनमध्ये मध्यावधीपूर्वी सुनक यांच्या पक्षाची पीछेहाट; सर्व्हेत सुनक यांच्या पक्षास 117, तर विरोधकांना 425 वर जागा

    वृत्तसंस्था

    लंडन : भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि त्यांच्या हुजूर पक्षाचा ४ जुलै रोजी होणाऱ्या मतदानाआधी पराभव होणे निश्चित मानले जात आहे. देशाती बहुतांश निवडणूक सर्वेक्षणात हुजूर पक्षाचा सफाया होईल,असा अंदाज व्यक्त केला जात आहे. द इकॉनॉमिस्टच्या सर्व्हेत सुनक यांना सर्वाधिक ११७ जागा मिळण्याची शक्यता आहे. सावंता सर्व्हेनुसार, हुजूर पक्ष ५३ जागांवर आक्रसू शकतो.Sunak’s party retreats ahead of midterms in Britain; In the survey, Sunak’s party got 117 seats, while the opposition got 425 seats

    त्यामुळे पीएम सुनक यांचा पक्ष जेव्हा लोकप्रियतेच्या बाबतीत विरोधी मजूर पक्षापेक्षा २० अंक मागे होता तर मुदतपूर्व निवडणूक घेण्याची काय गरज होती,असा प्रश्न उपस्थित होत आहे. सुनक यांच्याकडे निवडणूक घेण्यासाठी ६ महिन्यांपेक्षा जास्त अवधी होता. हा काळ लोकांचे मतपरिवर्तन करण्यासाठी पुरेसा आहे,असे मानले जाते.



    स्टार्मरचा मजूर पक्ष म्हणाला, सत्तेत आल्यास भारतासोबत मोफत व्यापार करार करू

    विरोधी नेते कीर स्टार्मर यांच्या मजूर पक्षाचे खासदार आणि शॅडो विदेशमंत्री डेव्हिड लॅमी यांनी सांगितले की, सत्तेत आल्यानंतर भारतासोबत मोफत व्यापार करारावर(एफटीए) प्राधान्याने काम करू. सुनक २०१० मध्ये सत्तेत आले. आतापर्यंत अनेक दिवाळ्या गेल्या, मात्र हुजूर पक्षाने भारतासोबत वापार करारावर स्वाक्षरी केली नाही. याआधी सुनक सरकारने ग्रॅज्युएशन व्हिसा रूट बंद करण्याची तयारी केली, तेव्हा स्टार्मर यांनी विरोध केला. यानंतर सुनक सरकारला हा निर्णय मागे घ्यावा लागला.

    हुजूर पक्षात सुनक यांची जागा घेण्यासाठी लॉबिंग सुरू

    ब्रिटनमध्ये निवडणुकीनंतर हुजूर पक्षात नेतृत्व बदलाची चर्चा सुरू झाली आहे. हुजूर पक्षातील अनेक नेत्यांनी पक्षाचे नेतृत्व स्वीकारण्यासाठी लाॅबिंग सुरू केली. त्यातील काही प्रमुख नेते असे.

    Sunak’s party retreats ahead of midterms in Britain; In the survey, Sunak’s party got 117 seats, while the opposition got 425 seats

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या