विशेष प्रतिनिधी
शांघाय : कम्युनिस्ट चीन धर्म मानत नसला तरी तेथे अनेक पद्धतींनी मुस्लिमांचा छळ सुरू आहे. व्हाट्सएप वापरल्यास गुन्हेगार ठरवून महिलांचे शुद्धीकरणकरण्यात येत आहे. त्यांना पोपटी रंगांच्या पट्ट्या असलेला गणवेश घालायला लावून सामाजिक कार्यकर्त्यांकडून समुपदेशन केले जात आहे.Such persecution of Muslims in China, purification of women by convicting them if they use WhatsApp
चीन अनेक महिन्यांपासून मुस्लिम वांशिक गटातील महिलांना ताब्यात घेत आहे. मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲप आणि शाळेच्या जीमेल अकाऊंटमध्ये प्रवेश करण्यासारख्या सायबर गुन्ह्यांपूर्वीच या महिलांना ताब्यात घेतलं जातंय. चिनी अधिकारी अशा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवर प्री-क्रिमिनल म्हणजेच पूर्वाश्रमीचे गुन्हेगार असल्याचा ठपका ठेवत आहेत, असा दावा “इन द कॅम्प्स: चायनाज हाय-टेक पेनल कॉलनी” या पुस्तकात करण्यात आला आहे.
या पुस्तकात वॉशिंग्टन विद्यापीठातील विद्यार्थिनी वेरा झोउला अलीकडेच तिचे शाळेतील जीमेल अकाउंट उघडण्यासाठी आणि चीनच्या शिनजियांगमध्ये गृहपाठ सबमिट करण्यासाठी व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क (व्हीपीएन) वापरल्यामुळे ताब्यात घेण्यात आले होते. झोउला कळवण्यात आले की तिला ‘री-एज्युकेशन’ क्लाससाठी पाठवले जात आहे.
तिला पोपटी रंगांच्या पट्ट्या असलेला गणवेश घालण्यासाठी देण्यात आला. तसेच झोउने थँक्सगिव्हिंग, ख्रिसमस आणि २०१८ चे नवीन वर्ष त्या कॅम्पमध्ये घालवले होते. कॅम्पमध्ये सहा महिने घालवल्यानंतर झोउला काही अटींखाली सोडण्यात आले. अटींमुळे तिला तिच्या स्थानिक परिसरात राहणं बंधनकारक करण्यात आलं होतं. तसेच तिला नियमितपणे एका सामाजिक कार्यकर्त्याकडे उपस्थिती दर्शवावी लागत होती.
एक कोटींहून अधिक उईघूर आणि इतर मुस्लिम गटातील लोकांना चीनमधील शिबिरांमध्ये ठेवण्यात आले आहे. या शिबिरांमध्ये जबरदस्तीने मजुरी करवून घेतली जात असल्याचा आरोप काही कार्यकर्त्यांनी केला आहे. झोउसह इतर ११ मुस्लिम महिलांना पोलिसांनी चीनच्या इंटरनेट सुरक्षा कायद्यानुसार पूर्व गुन्हेगार म्हटलंय, असे या पुस्तकात म्हटले आहे.
Such persecution of Muslims in China, purification of women by convicting them if they use WhatsApp
महत्त्वाच्या बातम्या
- देशात अनेक ठिकाणी जीमेल सेवेत व्यत्यय, युजर्सना लॉगिन आणि प्रवेशात अडचण, सोशल मीडियावर #GmailDown ट्रेंडिंगवर
- Retail Inflation : सप्टेंबर महिन्यात सर्वसामान्यांना महागाईपासून मिळाला दिलासा, किरकोळ महागाई दर 4.35 टक्क्यांवर
- Coal Shortage : कोळशाच्या कमतरतेमुळे महाराष्ट्रात वीज कमी पडू देणार नाही, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची ग्वाही, ग्राहकांना काटसरीने वीज वापराचे आवाहन
- Coal Crisis : केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, “आम्ही राज्यांना कोळशाचा साठा वाढवण्यास सांगितले होते, पण त्यांनी तसे केलेच नाही!”
- हवाई प्रवासासंदर्भात मोठा निर्णय, देशांतर्गत उड्डाणांवरील निर्बंध हटवले, आता 100 टक्के प्रवासी क्षमतेला मुभा