• Download App
    रशियाने हाइपर्सोनिक क्रूज मिसाइल जिरकॉनचे यशस्वी परीक्षण केले | Successful test fire of Russia's Hypersonic Tsirkon (Zircon) Missile

    रशियाने हाइपर्सोनिक क्रूज मिसाइल जिरकॉनचे यशस्वी परीक्षण केले

    विशेष प्रतिनिधी

    मॉस्को: रशियाच्या नौदलाने एका परमाणु पाणबुडीच्या मदतीने जिरकॉन हाइपरसोनिक क्रूज मिसाइलचे यशस्वी परीक्षण केले आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, हे परीक्षण बैरंट समुद्रातून केले गेले. परीक्षण चालू असताना या मिसाईलचे ध्येय निश्चित केले गेले. रशियाने एका परमाणू पाणबुडीच्या मदतीने पहिल्यांदाच अशा प्रकारचे मिसाईल परीक्षण केले असल्याचे सांगितले जात आहे.

    Successful test fire of Russia’s Hypersonic Tsirkon (Zircon) Missile

    परमाणु पाणबुडी सेवेरोडविंस्क मधून या हाइपर्सोनिक क्रूस मिसाईलने बैरंट समुद्रातून आपले लक्ष साधले. या नव्या पिढीच्या जिरकॉन हाइपरसोनिक मिसाइलचे रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी कौतुक केले आहे.


    उत्तर कोरियाने नवीन हायपरसोनिक क्षेपणास्त्र केले लाँच


    रशियन मंत्रालयाने या परिक्षणाचा एक व्हिडीओही प्रदर्शित केला आहे. ज्यामध्ये असे दिसते की ही मिसाईल रात्रीच्या अंधारात समुद्रातून आकाशाकडे वेगाने उड्डाण करीत आहे. या एंटी शिप क्रूज मिसाइलचे यशस्वी परीक्षण झाल्यानंतर लवकरच तिला सक्रीय करण्यात येईल. अशा प्रकारचे हाइपरसोनिक मिसाईल अमेरिकेकडे सुद्धा नाही.

    Successful test fire of Russia’s Hypersonic Tsirkon (Zircon) Missile

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Hormuz Strait : खामेनींच्या अंत्ययात्रेदरम्यान होर्मुझमध्ये इराणी हल्ले; 3 टँकरवर डागले क्षेपणास्त्र; म्हटले- जहाजांनी निश्चित केलेला मार्ग सोडला

    Emmanuel Macron : सीरियात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या दौऱ्यादरम्यान स्फोट; ज्या हॉटेलमध्ये थांबायचे होते त्याच्याजवळ स्फोट, सुरक्षा वाढवली

    Louis Vuitton : लोगो वादात मॉली टी वर लुई वितोंचा विजय; चीनी न्यायालयाने $15 लाख नुकसानभरपाई आणि माफीचा आदेश दिला