वृत्तसंस्था
कोलंबो : श्रीलंकेचे पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे यांनी पदाचा राजीनामा दिला. तसेच श्रीलंकेतील ३६ तासांचा कर्फ्यू आज उठवला. श्रीलंकेत सार्वजनिक वाहतूक सामान्य सेवा आता पूर्ववत केली आहे.Sri Lankan PM resigns New cabinet formed soon
आर्थिक संकटाच्या विरोधात सरकारविरोधी निदर्शने केल्यानंतर, पंतप्रधान महिंदा राजपक्षे वगळता श्रीलंकेच्या मंत्रिमंडळाने रविवारी रात्री सामूहिक राजीनामा दिला होता. परंतु राजपक्षे यांनी राजीनामा दिला नव्हता. दरम्यान राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे आता देश वाचविण्यासाठीं काय भूमिका घेतात ? याकडे लक्ष लागले आहे.
नवीन मंत्रिमंडळााबाबत राजपक्षे आज विशेष वक्तव्य करू शकतात. दरम्यान राष्ट्रपती आज कॅबिनेट मंत्र्यांचे राजीनामे स्वीकारतील अशी अपेक्षा आहे. गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेतील लोकांचा राग शांत करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांमध्ये नवीन मंत्रिमंडळाची स्थापना होण्याची शक्यता आहे. रविवारी सर्व २६ मंत्र्यांनी पदांचा राजीनामा दिला होता.
Sri Lankan PM resigns New cabinet formed soon
महत्त्वाच्या बातम्या
- देशात परभणीत उच्चांकी पेट्रोलचा दर; १२१ रुपये लिटर, राजस्थानात १२० रुपये
- Rana Ayyub : राणा आयुबला परदेश प्रवासाची सशर्त परवानगी; ईडीला प्रवासाचे तपशील सादर करावे लागणार!!
- एसटी सुरू करा, नाहीतर खुर्ची खाली करा!!; ठाकरे – परबांना शाळकरी मुलाचा काव्यातून इशारा!!
- पुण्यातील ‘त्या’ कोंबडीचोरांना पोलिसांनी अखेर केले गजाआड