• Download App
    : सरकारविरोधी आंदोलकांवर पोलिसांनी केला गोळीबार; एक ठार, अनेक जखमी|Sri Lanka Crisis Police fire on anti-government protesters; One killed, several injured

    श्रीलंका : सरकारविरोधी आंदोलकांवर पोलिसांनी केला गोळीबार; एक ठार, अनेक जखमी

    श्रीलंका सध्या आर्थिक संकटातून जात आहे. श्रीलंकेत आर्थिक संकटाबाबत सातत्याने सरकारविरोधी निदर्शने होत आहेत. आज श्रीलंकेच्या पोलिसांनी या आंदोलकांवर गोळीबार केला आहे. या गोळीबारात एका तरुणाचा गोळी लागल्याने मृत्यू झाला आहे.Sri Lanka Crisis Police fire on anti-government protesters; One killed, several injured


    वृत्तसंस्था

    कोलंबो : श्रीलंका सध्या आर्थिक संकटातून जात आहे. श्रीलंकेत आर्थिक संकटाबाबत सातत्याने सरकारविरोधी निदर्शने होत आहेत. आज श्रीलंकेच्या पोलिसांनी या आंदोलकांवर गोळीबार केला आहे. या गोळीबारात एका तरुणाचा गोळी लागल्याने मृत्यू झाला आहे.

    घटनेची कबुली देताना, श्रीलंका पोलिस विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले की, जमावाने हिंसक झाल्यानंतर आणि दगडफेक केल्यानंतर त्यांना गोळीबार करावा लागला. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीलंकेतील तेलाची तीव्र टंचाई आणि त्याच्या वाढलेल्या किंमतींच्या निषेधार्थ राजधानी कोलंबोपासून 95 किमी अंतरावर असलेल्या मध्य श्रीलंकेच्या रामबुकाना येथे लोकांनी महामार्ग रोखला होता.



    श्रीलंकेच्या इंधन कंपन्यांची तेलाच्या दरात वाढ

    महामार्ग ठप्प झाल्यामुळे तेथे निदर्शने सुरू झाली. या घटनेच्या निषेधार्थ तेथे टायर जाळण्यात आले आणि राजधानीकडे जाणारे प्रमुख रस्ते रोखण्यात आले. आज, मंगळवारी, श्रीलंकेची सरकारी तेल कंपनी सिलोन पेट्रोलियम कॉर्पोरेशन (CPC) ने सोमवारी मध्यरात्रीपासून इंधनाच्या दरात वाढ केली आहे. यापूर्वी इंडियन ऑइलच्या स्थानिक ऑपरेशन्सने दरवाढीची घोषणा केली होती.

    महिन्याभरात दोनदा भाव वाढले

    विशेष म्हणजे, श्रीलंकेला गंभीर आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असून ताज्या निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार आहेत. CPC ने 92 ऑक्टेन पेट्रोलची किंमत 84 रुपयांनी वाढवून 338 रुपये प्रति लीटर केली आहे. ही किंमत आता श्रीलंकन ​​इंडियन ऑइल कंपनी (LIOC) च्या प्रति लिटर किमतीएवढी झाली आहे. CPC ने एका महिन्यात दोनदा किंमत वाढवली आहे.

    Sri Lanka Crisis Police fire on anti-government protesters; One killed, several injured

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Karki : नेपाळच्या पीएम कार्की यांना जेन-झी नेत्याचा इशारा- आमचे ऐकले नाही तर जिथून आणले तिथे फेकू

    Pakistan President : पाकिस्तानी राष्ट्रपतींची चीनमधील J-10C लढाऊ विमान कारखान्याला भेट; शस्त्रांचे केले कौतुक

    Qatar : कतारमध्ये इस्रायलविरुद्ध 50 मुस्लिम देश एकत्र आले; इराणने म्हटले- इस्लामिक देशांनी इस्रायलशी संबंध तोडावे