वृत्तसंस्था
कोलंबो : श्रीलंकेत अवघ्या 4 महिन्यांत चौथ्यांदा आणीबाणी लागू करण्यात आली आहे. काळजीवाहू राष्ट्रपती रनिल विक्रमसिंघे यांनी आणीबाणी घोषित केली. 20 जुलै रोजी राष्ट्रपतिपदासाठी निवडणूक होणार आहे. त्याच्या तोंडावरच हा निर्णय घेण्यात आला आहे.Sri Lanka Crisis Fourth Emergency in Sri Lanka after 4 months; Presidential election tomorrow
विक्रमसिंघे यांच्याकडून हा आदेश देण्यात आला. देशात आर्थिक संकट आहे. त्यामुळे कायदा-सुव्यवस्था व जीवनावश्यक वस्तूंचा सुरळीत पुरवठ्यासाठी 18 जुलैपासून आणीबाणी लागू करत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
श्रीलंकेत पहिल्यांदा राजपक्षे सरकारने 1 एप्रिलला आणीबाणी लागू केली होती. 5 एप्रिलला मात्र आणीबाणी हटवण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा 6 मे पासून 20 मेपर्यंत लागू केली.
मतभेद विसरून सरकार स्थापन करा
विक्रमसिंघे यांनी राजकीय पक्षांना मतभेद विसरून सर्वांनी मिळून सरकार स्थापन करण्याचे आवाहन केले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीश सकारात्मक चर्चा होईल, असा विश्वास व्यक्त केला.
Sri Lanka Crisis Fourth Emergency in Sri Lanka after 4 months; Presidential election tomorrow
महत्वाच्या बातम्या
- युरोपीय देश उष्णतेने त्रस्त : पोर्तुगाल, फ्रान्समध्ये पारा 40 अंशांच्या पुढे; यूकेमध्ये रेड अलर्ट, स्पेनमध्ये उष्णतेच्या लाटेने 237 जणांचा बळी
- India-China Meeting : LAC वर सैन्याची तैनाती कमी होईल? भारत आणि चीनमध्ये सुमारे 12 तास चालली बैठक
- अमेरिकेच्या मॉलमध्ये गोळीबार : 3 ठार, 2 जखमी; सशस्त्र नागरिकाने हल्लेखोराला केले ठार
- Margaret Alva Profile : काँग्रेस हायकमांडवर तिकीट विकल्याचा केला होता आरोप; राजस्थानसह चार राज्यांच्या राहिल्या राज्यपाल