• Download App
    चिनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानने बनवले स्पेशल युनिट; कर्जाच्या पैशांचा असा होतोय वापर! Special unit created by Pakistan for security of Chinese nationals This is how loan money is used

    चिनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानने बनवले स्पेशल युनिट; कर्जाच्या पैशांचा असा होतोय वापर!

    खैबर पख्तुनख्वामधील विविध प्रकल्पांवर मोठ्याप्रमाणात पोलीस कर्मचारी तैनात

    विशेष प्रतिनिधी

    चीनकडून पैसे घेतल्यानंतर पाकिस्तान आता आपल्याला मदतकरणाऱ्यासाठी प्रत्येक प्रकरे बदल करण्याच्या तयारीत आहे. पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वामधील विविध प्रकल्पांवर काम करणाऱ्या चिनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानकडून विशेष सुरक्षा युनिट तयार करण्यात आले आहे. यासाठी दीड हजारांहून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत.Special unit created by Pakistan for security of Chinese nationals This is how loan money is used

    अधिकाऱ्यांच्या मते, विशेष सुरक्षा युनिट व्यतिरिक्त खैबर पख्तूनख्वामधील या परदेशी आणि त्यांच्या प्रकलपांच्या सुरक्षेसाठी जिल्हा पोलीस, एलीट फोर्स आणि फ्रंटियर रिसर्व्ह पोलिसांचे मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी देखील तैनात करण्यात आले आहेत. पोलीस महानिरीक्षक अख्तर हयात खान यांनी पेशावरमधील चायना विंडे येथे झालेल्या कार्यक्रमात याबाबात पुष्टी केली आहे.


    भारतात होणार छोट्या विमानांची निर्मिती : एम्ब्रेयर आणि सुखोईच्या उत्पादनासाठी चर्चा, दुर्गम भागात होणार फायदा


    पाकिस्तानी वृत्तसंस्था द न्यूज इंटरनॅशनलने दिलेल्या वृत्तानुसार, अख्तर हयात यांनी सांगितले की पोलीस महानिरीक्षकाच्या रूपाने कार्यभार स्वीकारल्यानंतर सुरक्षेची पाहणी करण्यासाठी त्यांनी यापैकी काही प्रकल्पांचा दौरा केला आहे. खैबर पख्तूनख्वाच्या वेगवेगळ्या भागात चिनी प्रकल्पांना पुरेशी सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. एसएसयूचे दीह हजार पोलीस कर्मचारी जिल्हा पोलीस, एलीट फोर्स आणि एफआरपीचे अन्य पोलीस कर्मचाऱ्यांसह त्यांना केपी सुरक्षा प्रदान केली जात आहे.

    पेशावर स्फोटानंतर कारवाई  –

    पेशावरच्या पोलीस लाईन्समधील मिशिदीत झालेल्या स्फोटानंतर पाकिस्तानने चिनी नागरिकांरच्या सुरक्षेसाठी खासगी कंपन्यांना काम देण्याच्या सूचन दिल्या होत्या. पंजाबच्या गृह विभागाने प्रांतात राहणाऱ्या किंवा खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या चिनी नागरिकांना त्यांच्या सुरक्षेसाठी अ दर्जाची सुरक्षा कंपन्यांना काम देण्याचे निर्देश दिले आहेत.

    पाकिस्तानला चीनकडून ७०० मिलियन डॉलर्स –

    अशातच आयएमएफ कडून कर्ज न मिळाल्यानंतर, चीनने पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्स देण्याची घोषणा केली आहे. यानंतर पाकिस्तानमधील चिनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी स्पेशल युनिट, मोठ्याप्रमाणात पोलीस कर्मचारी तैनात केले जात आहेत. असे म्हटले जात आहे की चीनने हे पैसे आपल्या नागरिकांच्या सुरक्षेची हमी घेतल्यानंतर दिले आहेत.

    Special unit created by Pakistan for security of Chinese nationals This is how loan money is used

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या