• Download App
    स्पेनच्या नाइट क्लबला आग, 13 जणांचा मृत्यू; छतही कोसळले, अनेक जण ढिगाऱ्याखाली गाडल्याची भीती, बचावकार्य सुरू|Spain nightclub fire, 13 dead; The roof also collapsed, many people are feared to be buried under the debris, rescue operations are underway

    स्पेनच्या नाइट क्लबला आग, 13 जणांचा मृत्यू; छतही कोसळले, अनेक जण ढिगाऱ्याखाली गाडल्याची भीती, बचावकार्य सुरू

    वृत्तसंस्था

    माद्रिद : स्पेनच्या मर्सिया शहरातील एका नाईट क्लबमध्ये रविवारी आग लागली. या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 4 जण जखमी झाले आहेत. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार आग लागल्यानंतर क्लबचे छत कोसळले. ढिगाऱ्याखाली अनेक लोक गाडले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे.Spain nightclub fire, 13 dead; The roof also collapsed, many people are feared to be buried under the debris, rescue operations are underway

    आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. त्याचबरोबर सरकारने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. अपघातात जखमी झालेल्या एका व्यक्तीने सांगितले- क्लबमधील अचानक दिवे गेले. अनागोंदी माजली होती. काही लोक आग लागल्याचे ओरडत होते. मग फायर अलार्म वाजला. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, ला फोंडा नावाच्या क्लबमध्ये आग लागली आणि त्याच्या शेजारील इतर दोन क्लबमध्ये पसरली.



    पहिल्या मजल्यावर सापडले 7 मृतदेह

    एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले- आगीमुळे ला फोंडा क्लबचे छत कोसळले. त्यामुळे माणसे मिळणे कठीण होत आहे. आम्हाला सध्या आग कुठे लागली हे माहित नाही, परंतु आम्हाला पहिल्या मजल्यावर 7 मृतदेह आढळले.

    वाढदिवसाचे सेलिब्रेशन होते चालू

    स्पॅनिश मीडियानुसार, क्लबमध्ये अनेक वाढदिवसाच्या पार्टी सुरू होत्या. सरकारने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आणि मर्सिया सिटी हॉलबाहेरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर खाली उतरवला

    Spain nightclub fire, 13 dead; The roof also collapsed, many people are feared to be buried under the debris, rescue operations are underway

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Canada : कॅनडात मंदिराच्या भिंतीवर लिहिल्या खलिस्तानी घोषणा; नगर कीर्तनापूर्वी कारवाई

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार