• Download App
    उद्योगपती एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सचे ‘फाल्कन’ अवकाशात झेपावले; सोबत पाच अंतराळवीरही...|Spaceex launch Falcon in space

    उद्योगपती एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सचे ‘फाल्कन’ अवकाशात झेपावले; सोबत पाच अंतराळवीरही…

    विशेष प्रतिनिधी

    केप कॅनव्हेराल : ‘स्पेसएक्स’ या खासगी अवकाश संशोधन कंपनीने त्यांच्या फाल्कन रॉकेट आणि कुपीच्या साह्याने चार अवकाशवीरांना आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या दिशेने पाठविले.उद्योगपती एलॉन मस्क यांच्या या कंपनीतर्फे एका वर्षांत झालेले हे तिसरे प्रक्षेपण आहे.Spaceex launch Falcon in space

    प्रक्षेपणासाठी वापरलेल्या रॉकेटचा आणि ‘ड्रॅगन’ कुपीचा हा फेरवापर आहे.ड्रॅगन कुपीमध्ये अमेरिका, जपान आणि फ्रान्स या देशांचे अवकाशवीर असून ते २३ तासांचा प्रवास करून उद्या (ता. २४) आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानकात पोहोचणार आहेत. ते सहा महिने या स्थानकात असतील.



    ‘नासा’च्या मेगन मॅकआर्थर हिच्यासाठी हा अवकाशदौरा विशेष ठरला आहे. कारण स्पेसएक्सच्या पहिल्या मानवी मोहिमेत तिच्या पतीने सहभाग घेतला होता. त्याच कुपीतून आता ती अवकाशस्थानकाकडे जात आहे. याशिवाय, शेन किम्ब्रो (अमेरिका), अकिहितो होशिदे (जपान) आणि थॉमस पेसक्वेट (फ्रान्स) यांचा कुपीत समावेश आहे.

    ‘स्पेक्सएक्स’ने गेल्या वर्षी मे महिन्यात प्रथमच अवकाशवीरांसह रॉकेटचे प्रक्षेपण केले होते. खासगी कंपनीतर्फे झालेली ही पहिली मानवी मोहिम होती. या प्रक्षेपणावेळी ड्रॅगन कुपीचा वापर करण्यात आला होता.

    त्यानंतर आज प्रथमच स्पेसएक्सने कुपी आणि रॉकेटचा फेरवापर केला आहे. कुपी आणि रॉकेटचा फेरवापर शक्य झाल्याने खर्चात मोठी बचत होणार आहे.

    Spaceex launch Falcon in space

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Japan Road Accident : जपानमध्ये 60 हून अधिक गाड्यांची धडक, अनेक गाड्या जळून खाक, 2 ठार, 26 जखमी

    US Snow Storm : अमेरिकेत बर्फाच्या वादळामुळे हजारो विमानांची उड्डाणे रद्द, 3 वर्षांतील सर्वाधिक बर्फवृष्टी

    UAE President : UAE अध्यक्ष पाकिस्तानात पोहोचले; PMसोबत द्विपक्षीय चर्चा, व्यापार-ऊर्जेवर कराराची शक्यता