विशेष प्रतिनिधी
केप कॅनव्हेराल : ‘स्पेसएक्स’ या खासगी अवकाश संशोधन कंपनीने त्यांच्या फाल्कन रॉकेट आणि कुपीच्या साह्याने चार अवकाशवीरांना आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या दिशेने पाठविले.उद्योगपती एलॉन मस्क यांच्या या कंपनीतर्फे एका वर्षांत झालेले हे तिसरे प्रक्षेपण आहे.Spaceex launch Falcon in space
प्रक्षेपणासाठी वापरलेल्या रॉकेटचा आणि ‘ड्रॅगन’ कुपीचा हा फेरवापर आहे.ड्रॅगन कुपीमध्ये अमेरिका, जपान आणि फ्रान्स या देशांचे अवकाशवीर असून ते २३ तासांचा प्रवास करून उद्या (ता. २४) आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानकात पोहोचणार आहेत. ते सहा महिने या स्थानकात असतील.
‘नासा’च्या मेगन मॅकआर्थर हिच्यासाठी हा अवकाशदौरा विशेष ठरला आहे. कारण स्पेसएक्सच्या पहिल्या मानवी मोहिमेत तिच्या पतीने सहभाग घेतला होता. त्याच कुपीतून आता ती अवकाशस्थानकाकडे जात आहे. याशिवाय, शेन किम्ब्रो (अमेरिका), अकिहितो होशिदे (जपान) आणि थॉमस पेसक्वेट (फ्रान्स) यांचा कुपीत समावेश आहे.
‘स्पेक्सएक्स’ने गेल्या वर्षी मे महिन्यात प्रथमच अवकाशवीरांसह रॉकेटचे प्रक्षेपण केले होते. खासगी कंपनीतर्फे झालेली ही पहिली मानवी मोहिम होती. या प्रक्षेपणावेळी ड्रॅगन कुपीचा वापर करण्यात आला होता.
त्यानंतर आज प्रथमच स्पेसएक्सने कुपी आणि रॉकेटचा फेरवापर केला आहे. कुपी आणि रॉकेटचा फेरवापर शक्य झाल्याने खर्चात मोठी बचत होणार आहे.
Spaceex launch Falcon in space
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ऑक्सिजन देता का ऑक्सिजन…’ कोरोनाच्या सद्य : परिस्थितीवर विश्वनाथ गरुड यांची अंतर्मुख करणारी कविता
- सीएम केजरीवाल पंतप्रधान मोदींना का म्हणाले, गुस्ताखी माफ करा!, असे काय झाले मीटिंगमध्ये? वाचा सविस्तर…
- ऑक्सिजन निर्यातीचे खोटे वृत्त दिल्याने ‘मनिकंट्रोल’चा माफीनामा, चुकीच्या वृत्ताबद्दल व्यक्त केली दिलगिरी
- E-pass : राज्यात पुन्हा एकदा ई-पासची सुरुवात, कशी मिळवाल परवानगी? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप…
- भय इथले संपत नाही : कोरोना रुग्णांचा वाली कोण? सरकार मागच्या घटनांवरून धडा घेणार की नाही?
- असंवेदनशीलता : 13 बळी घेणाऱ्या विरार अग्निकांडावर आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणतात, ही काही नॅशनल न्यूज नाही!