विशेष प्रतिनिधी
सेऊल : इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनच्या संघर्षात हमासच्या रॉकेट हल्ल्यापासून आयर्न डोमने इस्रायलचे संरक्षण केले होते. आता दक्षिण कोरियाही आपल्या देशाभोवती आयर्न डोम यंत्रणा बसविणार आहे. उत्तर कोरियाचा माथेफिरू हुकूमशहा किंग जोन याच्या युध्दपिपासू धोरणामुळे दक्षिण कोरियाने हा निर्णय घेतला आहे.South Korea will also build the Iron Dome system, a decision due to North Korea’s belligerent policy
दक्षिण कोरिया सरकारने यासाठी २.६ अमेरिकन डॉलर्सचा निधी मंजूर केला आहे. इस्त्रायलच्या आयर्न डोम यंत्रणेप्रमाणेच यंत्रणा येथे उभारली जाणार आहे. यामुळे दक्षिण कोरियाचे उत्तर कोरियाने सोडलेल्या रॉकेट आणि दीर्घ पल्याच्या बंदुकीच्या गोळ्यांपासून संरक्षण होणार आहे.
दक्षिण कोरियातील सेऊल परिसरातच देशातील पाच कोटी २० लाख लोकसंख्येपैकी अर्धी लोकसंख्या राहते. मात्र, सेऊलचा हा परिसर उत्तर कोरियाच्या दीर्घ पल्याच्या बंदुका आणि रॉकेटच्या कक्षेत येतो. उत्तर कोरियातील माथेफिरू हुकूमशहा किंग जोन याच्या युध्दपिपासू वृत्तीमुळे दोन्ही देशांत कधीही युध्दाचा भडका उडू शकतो. त्यामुळे दक्षिण कोरियाने आपली संरक्षण व्यवस्था बळकट करण्यासाठी तयारी केली आहे.
गेल्या वर्षीच दक्षिण कोरिया सरकारने जारी केलेल्या आराखड्यात कोरियन पध्दतीचा आयर्न डोम विकसित करणार असल्याचे म्हटले होते. याबाबत नेमलेल्या समितीने आपला अहवाल सुह वुक यांना जारी केला. सुमारे २.६ बिलीयन डॉलर्स खर्च करून ही यंत्रणा उभी केली जाणार आहें. २०३५ पर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. ही यंत्रणा उभी केल्यावर दक्षिण कोरियाची संरक्षण सिध्दता वाढणार आहे. त्याचबरोबर शत्रच्या हल्याला तोंड देणे शक्य होणार आहे.
आयर्न डोमची जगातील सर्वोत्तम एअर डिफेन्समध्ये गणना होते. यामध्ये रॉकेट, तोफखाने, मोर्टार नष्ट करण्यासाठी खास डिझाइन केले आहे. विशेष म्हणजे आयर्न डोम कोणत्याही हवामानात काम करू शकते. , इस्रायलने पहिल्यांदा वर्ष २०१२ मध्ये याचा समावेश ताफ्यात केला होता. रडारच्या माध्यमातून शत्रूंकडून येणारी क्षेपणास्त्रे, रॉकेट्स ओळखली जातात आणि हवेतच ती नेस्तानाबूत केली जातात.
आयर्न डोम शत्रुच्या क्षेपणास्त्राचा हवेत वेध घेतो. शत्रुने एकाच वेळी अनेक रॉकेट, क्षेपणास्त्र डागली तरी आयर्न डोम त्यातील जवळपास ९५ ते १०० टक्के रॉकेट्स, क्षेपणास्त्रांचा वेध घेतो. त्यामुळे हवेत नष्ट झालेल्या रॉकेट, क्षेपणास्त्रांचे अवशेष जमिनीवर कोसळतात आणि नुकसान कमी होते. आयर्न डोम मोबाइल लाँचर ट्रकच्या मदतीने कोणत्याही ठिकाणी तैनात केले जाऊ शकतात. आयर्न डोमच्या या वैशिष्ट्यामुळे हमासने केलेले रॉकेट हल्ले निष्प्रभ ठरले होते.
South Korea will also build the Iron Dome system, a decision due to North Korea’s belligerent policy
महत्त्वाच्या बातम्या
- हिंदू कार्यकर्त्याचा शिरच्छेद करण्यासाठी एक कोटी रुपयांचे इनाम, बरेलीतील मौलानाला पोलीसांनी केली अटक
- सिंथेटिक ट्रॅकवर गाड्या घातल्याच्या प्रकरणात केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांचीही नाराजी, ट्विटरवर फोटो केले शेअर
- आंबिल ओढा प्रकरणी बिल्डरवर कारवाई करा अन्यथा पोलीस आयुक्तांविरोधात मानवी हक्क आयोगाकडे तक्रार, प्रकाश आंबेडकर यांचा इशारा
- बोलतो त्याप्रमाणे चालतो याचा अर्थ वाघ सर्कशीतलाच, त्याचा रिंगमास्टरही वेगळा, नारायण राणे यांचा शिवसेनेला टोला
- ओबीसी आरक्षणात आता चर्चा देवेंद्र फडणवीस यांच्या विवाहाची