विशेष प्रतिनिधी
दिल्ली : जगभर सध्या ओम्नीक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट मुळे पुन्हा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक देश दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या विमानावर बंदी घालत आहेत. याचा परिणाम व्यापारावर देखील झालेला दिसून येत आहे. दक्षिण आफ्रिकेकडून मात्र या सर्व गोष्टींवर नाराजी व्यक्त केली जात आहे. ही एक प्रकारची आम्हाला शिक्षाच आहे असे दक्षिण आफ्रिकेचे म्हणणे आहे.
South Africa expresses displeasur,. over travel restrictions in many countries due to fears of Omicron
कोरोनाचा हा व्हेरिएंट आफ्रिकेत सापडला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या व्हायरसच्या संक्रमणाच्या स्पीडबद्दल चिंता व्यक्त केली आहे. कारण आधीच्या व्हायरसच्या तुलनेत या व्हायसचे संक्रमन अधिक वेगाने होतेय असे डब्ल्यूएचओने सांगितले आहे.
या पार्श्वभूमीवर ब्रिटनचे पंतप्रधान यांनी पी सी आर टेस्ट अनिवार्य केले आहे. त्याचप्रमाणे येणाऱ्या प्रत्येक प्रवाश्याचे 10 दिवस विलगिकरण करण्यात यावे हे देखील बंधनकारक केले आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे देखील बंधनकारक केलेले आहे. ब्रिटनसोबत बऱ्याच इतर देशांकडून हे निर्बंध लादले जात आहेत.
बेल्जियन, इस्राईल, जर्मनी, हाँगकाँग, ब्रिटनमध्येही ओम्नीक्रोमचे रूग्ण आढळून आलेले आहेत. मागे दक्षिण आफ्रिकेतून जर्मनी मध्ये दाखल झालेल्या विमानातील एकूण 61 प्रवासी ओम्नी क्रोम व्हायरस संक्रमित आढळून आलेले होते. यामुळे जगातील अनेक देशांनी चिंता व्यक्त केली आहे.
South Africa expresses displeasur,. over travel restrictions in many countries due to fears of Omicron
महत्त्वाच्या बातम्या
- दहशतवादी संघटनांचा मार्गदर्शक हाजी आरिफचा भारतीय लष्कराने केला खात्मा
- युरियाची टंचाई संपणार, १६ लाख टन युरियाची आयात करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
- मुंबईच्या नाईट लाईफची जेवढी काळजी तेवढी महिलांच्या सुरक्षेची का नाही? चित्रा वाघ यांचा महाविकास आघाडीला सवाल
- अफगाणी लोकांना राजकारणाविना सहाय्य मिळावे, रशिया, चीनने भारतासोबत एकत्र यावे, एस. जयशंकर यांची भूमिका