• Download App
    स्वातंत्र्यदिनापूर्वी अमेरिकेत मास शूटिंगची धक्कादायक घटना, फिलाडेल्फियात 8 जणांवर गोळीबार, 4 जण ठार|Shootings before Independence Day in America, 8 people were shot in Philadelphia, 4 people were killed

    स्वातंत्र्यदिनापूर्वी अमेरिकेत मास शूटिंगची धक्कादायक घटना, फिलाडेल्फियात 8 जणांवर गोळीबार, 4 जण ठार

    वृत्तसंस्था

    वॉशिंग्टन : अमेरिकेत स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवस आधी पुन्हा एकदा गोळीबाराची भीषण घटना समोर आली आहे. या गोळीबारात 8 जणांना गोळी लागली असून त्यापैकी 4 जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याने आग का लावली, याचा तपास सुरू आहे.Shootings before Independence Day in America, 8 people were shot in Philadelphia, 4 people were killed

    ही गोळीबाराची घटना फिलाडेल्फिया, पेनसिल्व्हेनिया काउंटी (प्रांत) येथे घडली. येथे एका बंदूकधारी व्यक्तीने खुलेआम गोळीबार सुरू केला. राज्य पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराने बुलेटप्रूफ जॅकेट घातले होते. ताब्यात घेतलेल्या संशयिताकडे एक हँडगन, रायफल आणि अनेक मॅगझिन्सही होती.



    जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले

    पोलीस घटनास्थळी पोहोचले असतानाही हल्लेखोर लोकांवर अंदाधुंद गोळीबार करत असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी हल्लेखोराकडून एक रायफल, एक हँडगन आणि गोळ्यांची अतिरिक्त मॅगझिन जप्त केली आहे.

    अमेरिकेत सामूहिक गोळीबाराच्या 5 हृदयद्रावक घटना

    18 जुलै 2022 रोजी अमेरिकेतील इंडियाना येथील ग्रीनवुड पार्क मॉलमध्ये गोळीबाराची घटना घडली होती. मास शूटिंगदरम्यान10 लोकांना गोळ्या घालण्यात आल्या. त्यापैकी 3 जणांचा मृत्यू झाला.

    11 जुलै 2022 रोजी कॅलिफोर्नियाच्या दक्षिणेकडील भागात एका हाऊस पार्टीदरम्यान हल्लेखोराने अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेत एका महिलेसह 5 जणांना गोळ्या लागल्या, त्यापैकी 3 जणांना आपला जीव गमवावा लागला.

    4 जुलै 2022 रोजी अमेरिकेत 246वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात होता. यादरम्यान शिकागो, इलिनॉय येथील हायलँड पार्क येथे परेडचे आयोजन करण्यात आले होते. येथे अचानक गोळीबार सुरू झाला, ज्यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला. दुसऱ्याच दिवशी, 5 जुलै रोजी इंडियानाच्या ब्रेंडियाना येथील गॅरी भागात झालेल्या गोळीबारात 3 जणांना आपला जीव गमवावा लागला.

    1 जून 2022 रोजी तुलसा, ओक्लाहोमा येथे एका व्यक्तीने हॉस्पिटलच्या इमारतीत प्रवेश केला आणि वेगाने गोळीबार सुरू केला. या घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला. गुन्हा केल्यानंतर हल्लेखोराने आत्महत्याही केली.

    अमेरिकेतील टेक्सास येथे 15 मे 2022 रोजी सर्वात धोकादायक घटना उघडकीस आली. उवाल्दे शहरातील एका 18 वर्षीय मुलाने शाळेत घुसून गोळीबार केला, ज्यात 19 विद्यार्थ्यांसह 23 जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात 3 शिक्षकांनाही आपला जीव गमवावा लागला.

    Shootings before Independence Day in America, 8 people were shot in Philadelphia, 4 people were killed

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या