• Download App
    न्यूयॉर्कमधील ब्रुकलिन मेट्रो स्टेशनवर गोळीबार : 13 जण जखमी, काही स्फोट न झालेले बॉम्बही सापडले; हल्लेखोर फरार, संपूर्ण परिसर सील|Shooting at Brooklyn Metro Station in New York 13 injured, some unexploded bombs found; The assailant fled, sealing the entire premises

    न्यूयॉर्कमधील ब्रुकलिन मेट्रो स्टेशनवर गोळीबार : 13 जण जखमी, काही स्फोट न झालेले बॉम्बही सापडले; हल्लेखोर फरार, संपूर्ण परिसर सील

    अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील सबवे स्टेशनवर गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. प्राथमिक माहितीनुसार एकूण 13 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. ब्रुकलिन स्थानकावर घडलेल्या या घटनेनंतर जेव्हा तेथे शोधमोहीम राबवली गेली तेव्हा काही स्फोट न झालेले बॉम्बही सापडल्याचे काही अहवाल सांगतात.


    वृत्तसंस्था

    न्यूयॉर्क : अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील सबवे स्टेशनवर गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. प्राथमिक माहितीनुसार एकूण 13 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. ब्रुकलिन स्थानकावर घडलेल्या या घटनेनंतर जेव्हा तेथे शोधमोहीम राबवली गेली तेव्हा काही स्फोट न झालेले बॉम्बही सापडल्याचे काही अहवाल सांगतात.Shooting at Brooklyn Metro Station in New York 13 injured, some unexploded bombs found; The assailant fled, sealing the entire premises

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या व्यक्तीने गोळीबार केला त्याने बांधकाम कामगारासारखा पोशाख घातला होता. हे गोळीबाराचे आहे की बॉम्ब हल्ल्याचे प्रकरण आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, संशयित काही छोटे बॉम्ब घेऊन स्टेशनमध्ये घुसला होता. त्याच्या हातात बंदूकही होती. परिसर सील करण्यात आला असून हल्लेखोराचा शोध सुरू आहे.



    घटना कशी घडली?

    मीडिया रिपोर्ट्सनुसार, न्यूयॉर्कच्या उपनगरीय भागात ब्रुकलिनमधील लोक नेहमीप्रमाणे लोकल सबवे स्टेशनवर पोहोचत होते. येथून हे लोक शहराच्या इतर अनेक भागांत पोहोचतात. त्यासाठी मेट्रो स्थानकावर ट्यूब एरिया आहे. येथून तीन वेगवेगळ्या मार्गांवर मेट्रो ट्रेन धावतात. सकाळी 8.30 च्या सुमारास (अमेरिकेच्या वेळेनुसार) अचानक स्फोट झाला आणि काही सेकंदांनी गोळीबाराचा आवाज आला. त्यानंतर गदारोळ उडाला.

    हल्लेखोर बांधकाम कामगारांच्या पेहरावात दिसत होता

    काही प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे की एक माणूस बांधकाम कामगारांच्या पोशाखात दिसला (जे मेट्रो स्टेशनवर देखभालीचे काम पाहतात). त्याने रेल्वेजवळ बॅग फेकली. त्याच्या हातात बंदूकही होती. काही मिनिटांनंतर धूर ओसरला आणि अनेक लोक फलाटावर पडताना दिसले. त्यांच्या शरीरातून रक्त वाहत होते.

    रेल्वे सेवा बंद

    या घटनेनंतर तत्काळ या स्थानकावरून सर्व रेल्वे सेवा बंद करण्यात आल्या होत्या. ट्रेन जिथे होती तिथेच थांबवली होती. न्यूयॉर्क पोलिसांच्या कमांडो पथकाने स्टेशनचा ताबा घेतला आहे. एका प्रत्यक्षदर्शीने न्यूयॉर्क पोस्टला सांगितले की, प्रथम आम्ही बॉम्बस्फोटासारखा आवाज ऐकला. त्यानंतर गोळीबार सुरू झाला. लोकांनी तेथे लपण्याची जागा शोधली, मात्र गोळीबाराच्या तडाख्यात अनेक लोक आले.

    हल्लेखोर कोण?

    प्रत्यक्षदर्शी पुढे म्हणाला- आम्ही एका कृष्णवर्णीय हल्लेखोराला पाहिले. त्याची उंची जवळपास ५ फूट ५ इंच असावी. त्याने केशरी रंगाचा जंप सूट घातला होता. त्याने तोंडावर गॅस मास्कही लावला होता. त्याच्या पाठीवर सिलिंडरही होता. त्यात काय होते ते आम्हाला माहीत नाही.

    Shooting at Brooklyn Metro Station in New York 13 injured, some unexploded bombs found; The assailant fled, sealing the entire premises

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या