वृत्तसंस्था
ढाका : बांगलादेशमध्ये मोठा राजकीय राडा झाला आहे. हिंसाचाराच्या आगडोंबात होरफळलेला बांगलादेश सोडून पंतप्रधान शेख हसीना भारतात दाखल झाल्या आहेत. बांगलादेशमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. बांगलादेशमध्ये सध्या तणावाची स्थिती आहे. Shiekh Hasina resigns as Bangladesh PM
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. बांगलादेशमधील अस्थिर परिस्थिती सध्या पाहायला मिळतेय. मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे मोठा हिंसाचार सुरू आहे. शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर सत्ता लष्कराच्या ताब्यात गेली आहे.
शेख हसीना यांचे हेलिकॉप्टर भारतातील त्रिपुरा येथील आगरतळा विमातळावर लँड
बांगलादेशमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून तणाव आणि हिंसाचार सुरु आहे. देशाातील लोकांमध्ये संतापाची मोठी लाट उसळली आहे. 20 लाख लोक पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे कूच करत असल्याच्या घोषणेनंतर बांगलादेशच्या लष्करप्रमुखांनी पंतप्रधान शेख हसीना यांना राजीनामा देण्याचा सल्ला दिला. यानंतर त्यांनी राजीनाम्याचे पत्र दिले.
शेख हसीना यांनी हेलिकॉप्टरमधून देश सोडला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शेख हसीना यांचे हेलिकॉप्टर भारतातील त्रिपुरा येथील आगरतळा विमातळावर लँड झाले आहे. अशा स्थितीत भारत आपल्या मित्र राष्ट्राच्या विश्वासू नेत्याला आश्रय देणार आहे का??, असा प्रश्न उपस्थित केला जात होत आहे.
Shiekh Hasina resigns as Bangladesh PM
महत्वाच्या बातम्या
- Supreme Court : ट्रान्सजेंडर-सेक्स वर्कर्स रक्तदान प्रकरणी सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारला नोटीस; रक्तदानावर बंदी हे समानतेच्या अधिकाराचे उल्लंघन
- Devendra Fadnavis : चांदीवाल समितीचा अहवाल ठाकरे – पवार सरकारच्या काळातच आला; देशमुखांच्या दाव्यातली फडणवीसांनी काढली हवा!!
- Wayanad Landslides : वायनाड भूस्खलन- मृतांची संख्या 365 वर, 206 बेपत्ता; उद्ध्वस्त घरांमधून चोरी; मुख्यमंत्री म्हणाले- पुनर्वसनासाठी टाऊनशिप
- Samajwadi party : अयोध्येतले बलात्कार प्रकरण समाजवादी पार्टीच्या अंगलट; आधी झाकण्याचा डाव; पण आता न्यायाची मागणी!!