• Download App
    सॅटेलाइट इमेजवरून ड्रॅगनच्या कुरापती उघड, चीनमध्ये आंतर-खंडीय बॅलिस्टिक मिसाइलसाठी 100 हून जास्त नव्या सायलोंची निर्मिती । satellite images Shows that china building 100 new missile silos that may help it reach america

    सॅटेलाइट इमेजवरून ड्रॅगनच्या कुरापती उघड, चीनमध्ये आंतर-खंडीय बॅलिस्टिक मिसाइलसाठी 100 हून जास्त नव्या सायलोंची निर्मिती

    china building 100 new missile silos : चीनने देशाच्या वायव्येतील शहर युमेनजवळील वाळवंटात आंतर खंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रासाठी 100 हून अधिक नवीन सायलो बांधण्याचे काम सुरू केले आहे, असे अमेरिकेच्या एका आघाडीच्या वृत्तपत्राने उपग्रह प्रतिमांच्या आधारे सांगितले. चीनच्या या हालचालींना अण्वस्त्र क्षमतेचा विस्तार म्हणून पाहिले जात आहे. satellite images Shows that china building 100 new missile silos that may help it reach america


    वृत्तसंस्था

    वॉशिंग्टन : चीनने देशाच्या वायव्येतील शहर युमेनजवळील वाळवंटात आंतर खंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रासाठी 100 हून अधिक नवीन सायलो बांधण्याचे काम सुरू केले आहे, असे अमेरिकेच्या एका आघाडीच्या वृत्तपत्राने उपग्रह प्रतिमांच्या आधारे सांगितले. चीनच्या या हालचालींना अण्वस्त्र क्षमतेचा विस्तार म्हणून पाहिले जात आहे.

    ‘वॉशिंग्टन पोस्ट’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, सायलो बांधकाम प्रकल्प चीन आपली अण्वस्त्रे लपविण्यासाठी वापरू शकतो. चीनच्या विद्यमान अण्वस्त्रधारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या प्रक्षेपणासाठी अशाच प्रकारच्या 119 उत्पादन साइट्स सारख्याच आहेत. या क्षेपणास्त्रांची क्षमता अशी आहे की, प्रक्षेपणानंतर ते अमेरिकेतही पोहोचू शकतात.

    कॅलिफोर्नियाच्या जेम्स मार्टिन सेंटर फॉर नॉनप्रोलिफेरेशन स्टडीजमार्फत व्यावसायिक उपग्रहांकडून प्राप्त केलेल्या प्रतिमांमध्ये असे दिसून आले आहे की, बीजिंगपासून सुमारे 2,100 किलोमीटर अंतरावर गान्सू प्रांतात शेकडो चौरस मैलांवर उत्पादन साइट पसरलेली आहे. वृत्तानुसार, 100 हून अधिक क्षेपणास्त्र सायलोचे बांधकाम यशस्वी झाले, तर हे चीनसाठी ऐतिहासिक पाऊल ठरेल.

    विशेष म्हणजे चीनकडे आधीपासूनच 250 ते 350 अण्वस्त्रे असण्याची शक्यता आहे. या सायलोसाठी नवीन क्षेपणास्त्रांची वास्तविक संख्या माहिती नाही. चीनने यापूर्वीही बऱ्याच ठिकाणी डिकोय सायलोही तैनात केले होते.

    satellite images Shows that china building 100 new missile silos that may help it reach america

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य