• Download App
    SAARC बैठक रद्द, पाकिस्तानचे तालिबान प्रेम ठरले कारणीभुत | SAARC summit cancelled, Read to know the reasons

    SAARC बैठक रद्द, पाकिस्तानचे तालिबान प्रेम ठरले कारणीभुत

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: अफगाणिस्तानातील अमेरिकेचे सैन्य परत गेल्यानंतर अफगाणिस्तान तालिबानने ताब्यात घेतले आहे. तालिबान राजवटीबाबत बऱ्याच देशांनी थांबा व पहा अशीच भूमिका घेतली आहे. तालिबान सरकारला चीन आणि पाकिस्तान सारख्या काही देशांनी पाठिंबा दर्शवला आहे. त्यांना मदत करण्यासही काही देश तयार झाले आहेत. अशातच पाकिस्तानकडून अमेरिकेतील न्यूयॉर्क मध्ये होत असलेल्या देशांच्या सार्क बैठकीत तालिबानला सहभागी करण्याविषयी मागणी करण्यात आली. सार्क परराष्ट्र मंत्र्यांची महत्वपूर्ण बैठक पाकिस्तानच्या या तालिबानच्या मागणीमुळे रद्द करण्यात आली आहे. सार्कच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक होणार होती. त्यामध्ये अफगानिस्तानवर ताबा मिळवणाऱ्या हुकुमशाही तालिबानचा समावेश करण्याचा आग्रह पाकिस्तानने धरला होता. परंतु बहुतांश देशांनी तालिबानला सहभागी करण्यास विरोध दर्शवला.

    SAARC summit cancelled, Read to know the reasons

    २५ सप्टेंबर रोजी दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटना म्हणजेच सार्कची बैठक न्यूयॉर्क येथे आयोजित करण्यात आली होती. सदर बैठक पाकिस्तानने केलेल्या मागणीमुळे रद्द करण्यात आली आहे. भारतासह काही सदस्यांनी या प्रस्तावावर आक्षेप घेतला. सर्व देशांचे एकमत व सहमती न झाल्याने ही बैठक बंद करण्याचा निर्णय या परिषदेचे ह्या वर्षीचे होस्ट नेपाळने रद्द केला आहे. एका निवेदनाद्वारे नेपाळच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सदस्यांमध्ये एकमत नसल्याने बैठक रद्द झाल्याचे सांगितले आहे. पाकिस्तानसाठी सार्क देशांचा तालिबान सरकारच्या बैठकीतील सहभागाविषयीचा निर्णय हा एक धक्का आहे असे मानले जात आहे.


    Pakistan Bus Blast : पाकिस्तानच्या पेशावरमध्ये बसचा स्फोट, नऊ चिनी मजुरांसह 13 जण ठार


    दक्षिण आशियातील भारत, मालदीव, नेपाळ बांगलादेश, भूतान, पाकिस्तान आणि श्रीलंका या  देशांसाठी सार्क ही संस्था कार्य करते. अफगाणिस्तानची सार्क मधील जागा रिकामी ठेवण्याबाबत बहुसंख्य देशांनी बैठकीत सहमती दर्शवली होती. मात्र या निर्णयाबाबत पाकिस्तानने आक्षेप घेतल्याने सदर बैठक रद्द करण्यात आली. अफगाणिस्तानवर सत्ता स्थापन केल्याचा दावा तालिबानने केला असला तरी सत्तेसाठी प्रचंड संघर्ष सुरू आहे. तालिबान सरकारला जगभरातील देशांनी अद्याप मान्यता दिलेली नाही.

    SAARC summit cancelled, Read to know the reasons

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Canada : कॅनडात मंदिराच्या भिंतीवर लिहिल्या खलिस्तानी घोषणा; नगर कीर्तनापूर्वी कारवाई

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार