• Download App
    Putin रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा अमेरिकेला इशारा, तुम्हालाच परिणाम भोगावे लागतील

    Putin : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा अमेरिकेला इशारा, तुम्हालाच परिणाम भोगावे लागतील

    Putin

    विशेष प्रतिनिधी

    मॉस्को : Putin  रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अमेरिकेवर भारत आणि चीनला ऊर्जा संबंध तोडण्याचा दबाव टाकल्याबद्दल जोरदार हल्लाबोल केला. पुतिन यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की अशा दबावाच्या हालचालींचे आर्थिक परिणाम उलट अमेरिकेलाच भोगावे लागतील.Putin

    अमेरिकेने भारताच्या निर्यातींवर ऑगस्ट महिन्यात २५ टक्के अतिरिक्त शुल्क लावून एकूण कर ५० टक्क्यांवर नेला आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना पुतिन म्हणाले, “जर अमेरिकेने आमच्या व्यापार भागीदारांवर अधिक कर लावले तर जागतिक दर वाढतील आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हला व्याजदर उंच ठेवावे लागतील.”Putin

    पुतिन यांनी विशेषतः भारताचा उल्लेख करताना म्हटले, “भारत आमच्या ऊर्जा पुरवठ्याला नकार दिला तर त्याला तोटा होईल. पण भारतासारख्या देशातील जनता आपल्या नेतृत्वाच्या निर्णयांवर लक्ष ठेवते आणि कधीही अपमान सहन करणार नाही. मला पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगले ठाऊक आहेत, ते स्वतः असे पाऊल उचलणार नाहीत.”Putin 



    त्यांनी अमेरिकेच्या दुटप्पी भूमिकेवरही बोट ठेवले. पुतिन म्हणाले, “अमेरिका स्वतः रशियाकडून युरेनियम खरेदी करते, पण इतर देशांना रशियन ऊर्जा घेऊ नका असे सांगते.”

    दरम्यान, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे सल्लागारांनी अलीकडच्या महिन्यांत भारतावर रशियन तेल खरेदीबाबत टीका केली होती. ट्रम्प यांचे व्यापार सल्लागार पीटर नवारो यांनी तर भारताला “महाराजा ऑफ टॅरिफ्स” म्हणत मोदींवर पुतिन आणि शी जिनपिंग यांच्यासोबत मैत्री केली असा आरोप केला होता.

    याआधीही पुतिन यांनी एससीओ शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेला सावध केले होते. “भारत किंवा चीनशी असा वसाहतवादी भाषेत संवाद साधता येणार नाही. ती वेळ आता संपली आहे,” असे ते म्हणाले होते.

    रशियाचे परराष्ट्र मंत्री सेर्गेई लावरोव्ह यांनीही अमेरिकेला सुनावत म्हटले, “भारत आणि चीनसारख्या प्राचीन संस्कृती कधीही दडपणाखाली येणार नाहीत.”

    पुतिन यांनी मोदींच्या पाठिशी ठाम उभे राहत अमेरिकेला स्पष्ट संदेश दिला आहे की भारताला दबावाखाली झुकवणे शक्य नाही.

    Russian President Putin warns America

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Trump Project : गाझा ₹9.3 लाख कोटींमध्ये स्मार्ट सिटी बनणार; ट्रम्प सरकार ₹5 लाख कोटी देईल

    Trump : ट्रम्प यांनी वर्षभरात ₹18 हजार कोटींचा निधी गोळा केला; बदल्यात कोट्यवधींचे फायदे दिले

    Bangladesh Hindu : बांगलादेशातील चटगाव जिल्ह्यात हिंदू कुटुंबांची घरे जाळली; आग लावण्यापूर्वी बाहेरून दरवाजे बंद केले