सहा क्रू मेंबर्स आणि तीन एस्कॉर्ट्स देखील विमानात होते.”
विशेष प्रतिनिधी
युक्रेन : रशियाने बुधवारी सांगितले की 65 युक्रेनियन युद्धकैद्यांना घेऊन जाणारे त्यांचे Il-76 वाहतूक विमान युक्रेनच्या सीमेजवळील पश्चिम बेलग्राड भागात कोसळले.Russian military plane carrying 65 Ukrainian prisoners of war crash
या दुर्घटनेच्या व्हिडीओमध्ये विमान वेगाने खाली पडत असल्याचे दिसत आहे. व्हिडीओ पाहिल्यावर दिसते की वैमानिकाचे विमानावरील नियंत्रण सुटले आणि ते निवासी भागात पडले. हे विमान त्याच्या उजव्या पंखावर कोसळले आणि लगेचच आगीच्या ज्वाळांमध्ये वेढल्या गेले.
आरआयए नोवोस्ती या वृत्तसंस्थेने संरक्षण मंत्रालयाच्या हवाल्याने सांगितले की, “विमानात 65 पकडलेले युक्रेनियन सैनिक होते ज्यांना बेलग्राड प्रदेशात नेले जात होते.. सहा क्रू मेंबर्स आणि तीन एस्कॉर्ट्स देखील विमानात होते.”
बेल्गोरोडचे गव्हर्नर ग्लॅडकोव्ह यांनी या घटनेची पुष्टी केली परंतु अधिक तपशील देण्यास नकार दिला. या विमानाच्या अपघाताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र रशियाकडून याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही.
Russian military plane carrying 65 Ukrainian prisoners of war crash
महत्वाच्या बातम्या
- कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर; केंद्राची घोषणा; दोन वेळा राहिले बिहारचे मुख्यमंत्री
- महाराष्ट्र अवयवदानात देशात अग्रेसर; शेकडो रुग्णांना जीवदान
- राम मंदिराचे मुख्यमंत्री योगी यांनी केले हवाई निरीक्षण
- मीरा रोडच्या नया नगरमध्ये बुलडोझरची धडक कारवाई, दंगलखोरांची बेकायदा बांधकामे उद्ध्वस्त!!