• Download App
    पुतीन सरकारची दंडेली, युक्रेन युध्दाबाबत टीका केली म्हणून रशियातील पत्रकाराला एक लाख रुबल दंड Russian journalist fined 100,000 rubles for criticizing Putin government over Ukraine war

    पुतीन सरकारची दंडेली, युक्रेन युध्दाबाबत टीका केली म्हणून रशियातील पत्रकाराला एक लाख रुबल दंड

    युक्रेन युद्धाबाबत टीका केल्याबद्दल रशियाच्या एका पत्रकाराला १ लाख रुबलचा दंड पुतीन सरकारने ठोठावला आहे. इल्या अझार असे या पत्रकाराचे नाव आहे. रशियाच्या लष्कराने केलेल्या कारवाईबाबत इल्या यांनी आपल्या लिखाणातून काही प्रश्न उपस्थित केले होते. ते पुतीन सरकारला आवडले नाहीत. Russian journalist fined 100,000 rubles for criticizing Putin government over Ukraine war


    विशेष प्रतिनिधी

    मॉस्को : युक्रेन युद्धाबाबत टीका केल्याबद्दल रशियाच्या एका पत्रकाराला १ लाख रुबलचा दंड पुतीन सरकारने ठोठावला आहे. इल्या अझार असे या पत्रकाराचे नाव आहे. रशियाच्या लष्कराने केलेल्या कारवाईबाबत इल्या यांनी आपल्या लिखाणातून काही प्रश्न उपस्थित केले होते.ते पुतीन सरकारला आवडले नाहीत.

    दरम्यान, युक्रेनमधील संघर्ष थांबविण्यासाठी चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढणे हाच एकमेव व्यवहार्य पर्याय आहे, असे भारताने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत म्हटले आहे. युक्रेनमधील स्थिती आणखी बिघडली असल्याबद्दल भारताने चिंता व्यक्त केली.



    संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या कायमस्वरूपी मिशनचे कौन्सिलर प्रतीक माथूर यांनी सांगितले की, युक्रेनमधील दिवसेंदिवस बिघडत चाललेल्या परिस्थितीबद्दल चिंता वाटणे स्वाभाविक आहे. युक्रेनचे युद्ध तत्काळ थांबवावे व शांततेसाठी चर्चेच्या मागार्ने तोडगा काढावा, अशी भारताची मागणी आहे. बुका येथे झालेल्या निरपराध लोकांच्या हत्याकांडाचा आम्ही तीव्र निषेध करतो. या युद्धामध्ये कोणाचाही विजय होणार नाही. उलट या संघषार्चा प्रत्येकाच्या आयुष्यावर परिणाम होत आहे.

    प्रतीक माथूर म्हणाले की, युक्रेनच्या युद्धग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यास प्राधान्य दिले पाहिजे. युक्रेन प्रश्नावर शक्यतो लवकर तोडगा निघणे आवश्यक आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी रशिया व युक्रेनचा दौरा केला; तसेच युद्ध थांबविण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. त्याला भारताने पाठिंबा दिला आहे.

    Russian journalist fined 100,000 rubles for criticizing Putin government over Ukraine war

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका