वृत्तसंस्था
कीव्ह : रशियाने युक्रेनवर व्हॅक्यूम बॉम्ब टाकल्याचा दावा युक्रेनच्या एका नेत्याने केला आहे. रशियन हवाई दलाच्या विमानांनी ओखतिर्का या शहरावर हा बॉम्ब टाकल्याचा आरोप शहराच्या महापौरांनी केला आहे . अणुबॉम्बच्या आधीच्या श्रेणीतला हा बॉम्ब असून रशियाच्या या अतिविध्वंसक बॉम्बला फादर ऑफ ऑल बॉम्ब (Father of All Bomb) असे संबोधले जाते.
व्हॅक्यूम बॉम्ब म्हणजे काय?
- व्हॅक्यूम बॉम्ब हे थर्मोबॅरिक शस्त्र (thermobaric weapon) आहे. थर्मोबॅरिक शस्त्रांमध्ये गनपावडरचा वापरत नाहीत. तर व्हॅक्यूम बॉम्बमध्ये उच्च-दाबाच्या स्फोटके भरलेली असतात.
- व्हॅक्यूम बॉम्ब वातावरणातील ऑक्सिजन शोषून घेऊन शक्तिशाली स्फोट घडवून आणतात. त्यामुळे प्रचंड जीवित आणि वित्तहानी होते संबंधित परिसरातले ऑक्सीजन वर आधारित असलेले जीवन संपते.
- व्हॅक्युम बॉम्बमुळे रेडिएशनचा जरी धोका नसला तरी मोठ्या प्रमाणात जीवितहानी होते.
व्हॅक्यूम बॉम्ब प्रचंड कंपनसंख्या असलेल्या ध्वनिलहरी (शॉकवेव्ह) उत्सर्जित करतो, त्यामुळे विनाश वाढतो. - व्हॅक्यूम बॉम्ब 44 टन टीएनटीच्या शक्तीने विस्फोट करण्यास सक्षम आहे. रशियाने 2016 मध्ये सीरियावर या व्हॅक्यूम बॉम्बचा वापर केल्याचा दावा होता. पण त्यावेळी त्याची पुष्टी झाली नव्हती.
- रशियाने 2007 मध्ये व्हॅक्यूम बॉम्ब विकसित केला. त्याचे वजन 7100 किलो आहे.
- अर्थात फक्त रशियाकडे व्हॅक्युम बाँब आहे असे नाही, तर अमेरिकेकडेही असाच बॉम्ब आहे ज्याला मदर ऑफ ऑल बॉम्ब (Mother of all Bomb) म्हणतात. 11 टन टीएनटीच्या शक्तीने त्याचा स्फोट होऊ शकतो. त्याचे नाव GBU-43/B आहे.
Russia Vacuum bomb
महत्त्वाच्या बातम्या
- RUSSIA UKRAINE WAR : FIFA आणि UEFA चा रशियाला झटका ! आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निलंबित ; 2022 च्या विश्वचषकातून रशियाची हकालपट्टी
- LOVE STORY OF President : प्रेमकहाणी !जगाला प्रेमात पाडणारे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर जेव्हा पडले होते ओलेनांच्या प्रेमात !
- रशिया-युक्रेनमध्ये चर्चेच्या दुसऱ्या बैठकीकडे जगाचे लक्ष; पहिल्या बैठकीत तोडगा नाही
- सोन्यात गुंतवणूक करा कमी किंमतीत; सार्वभौम गोल्ड बाँड खरेदीची ग्राहकांना मोठी संधी; ४ मार्चपर्यंत मुदत